Bail Hearing : जामीन प्रकरणांची सुनावणी वाढवा; धनंजय चंद्रचूड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chief Justice Dhananjay Chandrachud

Bail Hearing : जामीन प्रकरणांची सुनावणी वाढवा; धनंजय चंद्रचूड

नवी दिल्ली : प्रलंबित खटल्यांची संख्या कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दररोज दहा वैवाहिक प्रकरणे आणि दहा जामीन याचिकांवर सुनावणी करण्याचे आदेश आज सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी दिले. सरन्यायाधीशांनी न्यायाधीशांच्या बैठकीत सुनावणीचे प्रमाण वाढविण्याचे आदेश दिले.

नुकत्याच झालेल्या पूर्ण न्यायासनाच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे चंद्रचूड यांनी स्पष्ट केले. या गतीने सर्वोच्च न्यायालयातील १३ खंडपीठ दररोज किमान १३० प्रकरणे आणि दर आठवड्याला ६५० प्रकरणे निकाली काढतील. सध्या सर्वोच्च न्यायालयात खटले या न्यायालयातून त्या न्यायालयात हस्तांतर करण्याबाबतची १३ हजार प्रकरणे सध्या प्रलंबित आहेत.

‘ब्रीफिंग’ नसणारे वकील म्हणजे बॅटविना तेंडुलकर!’’

खटल्याची ब्रीफिंगची प्रत न घेता न्यायालयासमोर येणारे वकील म्हणजे मैदानात बॅट न घेता असलेल्या तेंडुलकरसारखे आहे, अशी टिप्पणी चंद्रचूड यांनी आज केली. त्यांच्यासमोर सुनावणी सुरू असलेल्या एका प्रकरणातील वकील जेव्हा हातात कागदपत्रांची संक्षिप्त प्रत न देता युक्तिवाद करू लागले तेव्हा चंद्रचूड यांनी वरील टिप्पणी केली.