Ajit Mohan: फेसबुक इंडियाचे प्रमुख अजित मोहन यांचा राजीनामा; काय घडलंय? जाणून घ्या

गेल्या चार वर्षांपासून त्यांनी फेसबुकमध्ये महत्वाची भूमिका निभावली आहे.
Ajit Mohan_Meta Facebook VP
Ajit Mohan_Meta Facebook VP

नवी दिल्ली : फेसबूक इंडियाचे प्रमुख अजित मोहन यांनी आपल्या पदाचा गुरुवारी राजीनामा दिला. आपल्या राजीनाम्याचं कारणं स्पष्ट करताना त्यांनी सांगितलं की, आपल्याला दुसरीकडं संधी मिळाली असल्यानं आपण मेटा कंपनी सोडत आहोत. गेल्या चार वर्षांपासून त्यांनी फेसबुकमध्ये महत्वाची भूमिका निभावली आहे. (Facebook India Head Ajit Mohan Resigns)

मेटाच्या ग्लोबल बिझनेस ग्रुपचे उपाध्यक्ष निकोला मेंडेलसोहन यांनी सांगितलं की, इतर ठिकाणी कामाची संधी मिळाल्यानं आपण मेटामधून पायउतार होण्याचा निर्णय घेतल्याचं अजित मोहन यांनी सांगितलं आहे. गेल्या चार वर्षांपासून मोहन यांनी भारतात फेसबुकच्या ऑपरेशन्ससाठी महत्वाची भूमिका निभावली आहे. लाखो भारतीय व्यवसाय, पार्टनर्स आणि लोकांसाठी त्यांनी काम केलं आहे.

हे ही वाचा : राष्ट्र तरेल कसे? धर्मकारणातून की धर्मनिरपेक्षतेतून?

आम्ही भारतासाठी अत्यंत वचनबद्ध आहोत. तसेच आमचं सर्व कार्य आणि भागीदारी पुढे नेण्यासाठी एक मजबूत नेतृत्व संघ आम्ही निर्माण केला आहे. अजितच्या नेतृत्व आणि योगदानाबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत आणि भविष्यासाठी त्यांना शुभेच्छा देतो, असंही मेंडेलसोहन यांनी म्हटलं आहे.

WhatsApp आणि Instagram वर जोडले २०० दशलक्ष युजर्स

जानेवारी 2019 मध्ये अजित मोहन फेसबुक इंडियामध्ये व्यवस्थापकीय संचालक म्हणून रुजू झाले होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली कंपनीनं WhatsApp आणि Instagram नं भारतात 200 दशलक्ष युजर्स जोडले. मेटा कंपनीत येण्यापूर्वी मोहन यांनी चार वर्षे स्टार इंडियाच्या व्हिडिओ स्ट्रीमिंग सेवा हॉटस्टारचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहिले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com