सावधान: संशोधनाच्या नावावर खोट्या बातम्यांचा पसरतोय 'व्हायरस'!

वृत्तसंस्था
मंगळवार, 7 जुलै 2020

कोरोना विषाणूचा हाहाकार सुरु असताना आणखी एका समस्येने तोंड वर काढले आहे. अनेक देशांतील वैज्ञानिक कोरोना विषाणूवर प्रभावी लस तयार करण्याच्या कामात गुंतले आहेत. असे असताना काही राजकीय नेत्यांची चुकीची वक्तव्ये आणि सोशल मीडियामधून पसरवल्या जाणाऱ्या अफवांचे पेव फुटले आहे.

नवी दिल्ली- कोरोना विषाणूचा हाहाकार सुरु असताना आणखी एका समस्येने तोंड वर काढले आहे. अनेक देशांतील वैज्ञानिक कोरोना विषाणूवर प्रभावी लस तयार करण्याच्या कामात गुंतले आहेत. असे असताना काही राजकीय नेत्यांची चुकीची वक्तव्ये आणि सोशल मीडियामधून पसरवल्या जाणाऱ्या अफवांचे पेव फुटले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने तर अशा अफवांना 'इंफोडेमिक' म्हणजे खोट्या बातम्यांची महामारी असं म्हटलं आहे.

अकोल्यात सरासरी एक कोरोना बळी, तीन महिन्यांत 90 मृत्यू
चुकीची माहिती लोकांपर्यंत पोहोचण्याची शक्यता प्रीप्रिंट सर्व्हरमुळे वाढली आहे. या सर्व्हरवर संशोधनासंबंधी माहिती ऑनलाईन स्वरुपात टाकली जाते. मात्र, अशा माहितीची स्वंतत्रपणे सत्यता पडताळली केलेली नसते.  गेल्या काही वर्षात अशा सर्व्हरवर अनेकांनी आपले संशोधन प्रसिद्ध केले आहे. हे संशोधन प्राथमिक स्वरुपातील असते. त्यावर अधिकचे संशोधन होणे बाकी असते. पण असे संशोधन सामान्यांपर्यंत पोहोचते आणि लोक ही माहिती खरी मानायला लागतात. प्रीप्रिंट सर्व्हरवर काहीही प्रसिद्ध केले जाऊ शकते. त्यावर कोणाचे नियंत्रण नसते.

वैद्यकीय संग्रहाबाबतही असंच आहे. या संग्रहावर अनेक शोध निबंध प्रसिद्ध केले जातात. तसेच अनेक वैज्ञानिक दावे केलेले असतात. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्यापासून या संग्रहावरील शोध निबंध प्रसिद्ध होण्याचे प्रमाण वाढले आहे. अनेक वैज्ञानिक यावर आपल्या संशोधनाची प्राथमिक माहिती प्रसिद्ध करत असतात. जेणेकरुन लोकांना यावर प्रश्न उपस्थित करता येतात. संग्रहावर प्रसिद्ध झालेले संशोधन हे अंतिम स्वरुपाचे नसते. यामुळे काही समस्या निर्माण होत आहेत.

वैद्यकीय संग्रहावर माहिती प्रसिद्ध झाल्याने ती लोकांपर्यंत तात्काळ पोहोचते. लोक अशी माहिती मोठ्या प्रमाणात शेअर करत असतात. मात्र, प्रसिद्ध झालेलं संशोधन के घाईमध्ये केलेले किंवा अपूर्ण असू शकते. त्यामुळे अशी माहिती सार्वजनिक होणं धोकादायक ठरु शकतं.

अरे काय खेळ लावलाय लोकांच्या जिवाशी : एकीकडे कोरोनाचा रिपोर्ट पाॅझिटीव्ह तर...
मलेरियावरील औषध हाईड्रॉक्सीक्लोरोक्वीन बाबतही असंच घडलं होतं. कोरोना विषाणूवर हाईड्रॉक्सीक्लोरोक्वीन प्रभावी असल्याचं 20 मार्चला एका शोध निबंधात प्रसिद्ध करण्यात आलं होतं. यावर हवं तसं संधोधन झालं नव्हतं. मात्र, सोशल मीडियात या औषधाबाबत माहिती पसरली आणि अनेकांनी याचा वापर सुरु केला. काहींनी डॉक्टरांच्या सल्ल्याशीवाय हे औषध घेतलं. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनीही हाईड्रॉक्सीक्लोरोक्वीन प्रभावी असल्याचं नागरिकांना सांगितलं होतं. त्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेला या औषधावर बंदी आणावी लागली होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: fake news sprading about corona virus cause problem