
कोडं उलगडलं; झारखंडमध्ये दिसलेली ती आकृती एलियनची होती का?
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये रस्त्यावरुन एक एलियनसदृश्य (alien) आकृती जात असल्याचं दिसून येत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यावर अनेकांनी ती आकृती म्हणजे एलियन (alien) असल्याचा दावा केला होता. मात्र, या व्हिडीओमागील सत्य आता समोर आलं आहे. व्हिडीओमध्ये दिसणारी आकृती एलियन नसून एक स्त्री आहे. विशेष म्हणजे ज्या व्यक्तीने हा व्हिडीओ शूट केला होता. त्याच व्यक्तीने या व्हिडीओमागील सत्य सांगितलं आहे. (false-claim-of-alien-seen-in-hazaribagh-jharkhand-know-the-truth)
मध्यंतरी सोशल मीडियावर झारखंडमधील हजारीबाग येथील एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये रात्रीच्या वेळी रस्त्यावरुन एक व्यक्ती जातांना दिसत होती. ही व्यक्ती पाहिल्यावर अनेकांनी तो एलियन असल्याचं म्हटलं होतं. मात्र, प्रत्यक्षात तो कोणताही एलियन नसून नग्नावस्थेत एक स्त्री होती. हा व्हिडीओ शेअर करतांना अनेकांनी त्यात दिसणारी आकृती एलियन असल्याचं म्हणत खोटी अफवा पसरवली होती. त्यामुळेच पाहता पाहता या व्हिडीओला १६ लाखांपेक्षा जास्त व्ह्युज मिळाले होते.

alien
काय आहे व्हिडीओमागील सत्य?
प्रत्यक्षात घडलेली घटना जमशेदपूर येथील आहे. जमशेदपूरमध्ये राहणाऱ्या दिपक हेंब्रम हे आपल्या काही मित्रांसोबत संबंधित रस्त्यावरुन जात होते. याचवेळी एक स्त्री नग्नावस्थेत रस्त्यावर फिरत होती. या स्त्रीला पाहिल्यावर दिपक आणि त्यांचे मित्र घाबरले आणि त्यांनी तेथून पळ काढला. मात्र, काही ठराविक अंतरावर गेल्यानंतर पाठीमागून येणाऱ्या काही व्यक्तींनी दिपक यांच्याकडे त्या स्त्रीविषयी विचारणा केली. त्यावेळी दिपक व त्यांचे मित्र पुन्हा घटनास्थळावर गेले आणि तिचा व्हिडीओ शूट केला. विशेष म्हणजे त्यानंतर हा व्हिडीओ एलियन म्हणून सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला.
एलियनची गोष्ट पूर्णपणे खोटी
हजारीबागमध्ये एलियन दिसला ही माहिती पूर्णत: खोटी आहे. सगळ्यांकडे या महिलेचा व्हिडीओ आहे आणि हा व्हिडीओ केवळ ३० सेकंदाचा आहे. हा व्हिडीओ मी व्हॉट्स अॅप स्टेटवर टाकला होता. जो लोकांनी कॉपी केला आणि पुढे व्हायरल केला.
दिपककडे आहे ओरिजनल व्हिडीओ
दिपक हेंब्रमकडे दिड मिनिटांचा ओरिजनल व्हिडीओ आहे. हा व्हिडीओ त्याने पुन्हा शेअर करुन एलियनची केवळ अफवा असल्याचं स्पष्ट केलं आहे. विशेष म्हणजे व्हिडीओत दिसणारी आकृती एलियन असल्याचा दावा केबीसी न्यूज कॅथर या फेसबुक अकाऊंटवरुन करण्यात आला होता. खरंच झारखंडमध्ये एलियन आहे का?, असं कॅप्शन त्यांनी या व्हिडीओला दिलं होतं. हा व्हिडीओ अद्यापही सोशल मीडियावर व्हायरल होत असून १६ लाखांपेक्षा जास्त व्ह्युज त्याला मिळाले आहेत.