मेथीची भाजी समजून चक्क खाल्ला गांजा; संपूर्ण कुटुंबच रुग्णालयात भरती 

वृत्तसंस्था
बुधवार, 1 जुलै 2020

मेथीची भाजी समजून गांजा खाल्ला आणि बेशुद्ध झाल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील कन्नोज परिसरात घडली आहे.

कन्नौज : मेथीची भाजी समजून गांजा खाल्ला आणि बेशुद्ध झाल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील कन्नोज परिसरात घडली आहे. यानंतर एकाच कुटुंबातील ६ जणांवर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. कुटुंबातील व्यक्तींनी मेथीची भाजी समजून गांजा खाल्ल्यानंतर त्यांना त्रास होऊ लागला आणि ते बेशुद्ध पडले. त्यांना स्थानिकांनी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

दरम्यान, गावातील एका तरुणानं मजेमध्ये मेथीची भाजी आहे असं सांगून त्यांना गांजा दिला होता. पोलिसांनी या प्रकरणी कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले आहे. कन्नौज सदर कोतवाली भागातील मियागंज गावात नवल किशोर नावाच्या व्यक्तीने ओमप्रकाश यांचा मुलगा नितेशला कोरडी मेथीची भाजी असल्याचं सांगून एक पिशवी दिली. त्यानंही कोरडी मेथीची भाजी आहे असं समजून भाजी बनवली आणि खाल्ली. संध्याकाळी मात्र या संपूर्ण कुटुबाची तब्येत बिघडली. या घटनेची माहिती शेजारच्यांनी तातडीनं पोलिसात कळवली आणि बेशुद्ध पडलेल्या नितेशसह त्याच्या कुटुंबियांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी भाजीचे सँपल्स ताब्यात घेतले आहेत. भाजी म्हणून गांजा विकणाऱ्या नवल किशोर नावाच्या तरुणाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. गंमत करणं एखाद्याला किती महागात पडू शकतं हे अनेकदा आपण पाहिलं आहे.
-------------- 
मोदींचे बिहार राजकारण : चीनच्या मुद्द्यावर शब्दही नाही छटपूजेचा मात्र आवर्जून उल्लेख
--------------
मोदींच्या भाषणावर राहुल गांधीना आठवला जुना शेर; काय आहे तो शेर?
--------------
अनेकदा छोटीशी गंमत अनेकांच्या जीवावर बेतल्याचंही आपण पाहिलं आहे. अशीच एका व्यक्तीने केलेली ही गंमत काही लोकांच्या जीवावर बेतली असती, अशीच ही घटना आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: UP Family Cooks Ganja Sabzi & Eats It Thinking Its Methi All Hospitalised

टॅग्स
टॉपिकस