Hathras case: पीडिता आणि आरोपींच्या कुटुंबात 23 वर्षांपासून वैर

सकाळ ऑनलाईन टीम
Sunday, 4 October 2020

यापुर्वी पीडितेच्या वडीलांनी आरोपी संदीपच्या वडीलांविरुध्द एससी/ एसटी ऍक्टखाली मारहान केल्याची तक्रार (FIR) केली होती

हाथरस:  उत्तरप्रदेशमधील हाथरसमध्ये झालेल्या अत्याचाराने देशभर संताप व्यक्त केला जात आहे. इथल्या गावकऱ्यांनी दिलेली माहिती आणि गुप्तचर विभागाच्या रिपोर्टनुसार अत्याचार झालेल्या पीडितेच्या कुटुंबामध्ये आणि आरोपीच्या परिवारात मागील 23 वर्षापासून वैर असल्याचं सांगितले आहे.

यापुर्वी पीडितेच्या वडीलांनी आरोपी संदीपच्या वडीलांविरुध्द एससी/ एसटी ऍक्टखाली मारहान केल्याची तक्रार (FIR) केली होती. बुलघडी गाव हे ठाकूरबहूल असून पीडिता ज्या  वाल्मिकी समाजातील होती तो समाज गावात अत्यल्प आहे. या गावात ठाकूरांतही दोन गट आहेत. त्यातील एक गटासोबत वाल्मीकी समाज आहे तर दुसऱ्या गटात आरोपी असलेले संदीप, रामू, लवकुश आणि रवी यांचा सामावेश आहे.  

वाचा सविस्तर- सावधान! मोदी सरकार मुलींच्या खात्यात 2 लाख रुपये पाठवत असल्याची पोस्ट होतेय व्हायरल

ठाकूरांचे दोन गट-
तीन आरोपी एकाच गटातील असल्याचं सांगितलं जातंय. त्यातील एक आरोपी रामूच्या काकांचा मुलगा रवी आहे. तसेच रामू आणि संदीप नातेवाईक आहेत. हे सर्वजण पीडितेच्या शेजारचे आहेत. दोन्ही ठाकूर गटात एका जमिनीवरील मालकी हक्कांवरून वाद असल्याचे सांगितलं जातंय. 

रामविलास पासवान यांची प्रकृती खालावली, रात्री शिरा झाली हार्ट सर्जरी

23 वर्षांपुर्वी केली होती एफआईआर-
जमिनीच्या वादातून ठाकूरांचे दोन गटात विभाजन झाले होते. तेंव्हापासून अनेकदा या दोन्ही गटात तणाव झाला होता. मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे 23 वर्षांपूर्वी पीडितेच्या वडिलांनी आरोपींचे वडील आणि त्याच्या भावाविरुद्ध मारहाण केल्याची तक्रार केली होती. पण नंतर दोन्ही गटातील वाद मिटला होता.

14 सप्टेंबरला झाला अत्याचार-
हाथरसमधील चंदपा पोलिस ठाणे क्षेत्रातील भागात 14 सप्टेंबरला चार तरुणांनी 19 वर्षीय तरुणीवर सामुहिक बलात्कार केला होता. यावर पोलिसांनी केलेल्या तपासावर मोठी टीका झाली होती. आरोपींवर सुरुवातीला बलात्काराच्या आरोपाखाली अटक न करता विनयभंगाच्या आरोपाखाली अटक केली होती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: family of the victim in Hathras and the accused family enmity for 23 years