मुंबईतील इमारतीला लागलेल्या आगीत प्रसिद्ध आयपीएल खेळाडूच्या बहीण आणि भाचीचा मृत्यू

प्रसिद्ध आयपीएल खेळाडू पॉल वलथटीवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या बहीणीचा आणि भाचीचा आगीत होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
मुंबईतील इमारतीला लागलेल्या आगीत प्रसिद्ध आयपीएल खेळाडूच्या बहीण आणि भाचीचा मृत्यू

आयपीएल क्रिकेटपटू पॉल वलपथी याची बहिण व आठ वर्षीय भाचा हे दोघे पॉलच्या आजारी आईला भेटण्यासाठी मुंबईत आले आणि या आगीत मृत्युमुखी पडले, अशी हृदय हेलावणारी माहिती त्याच्या नातलगांनी दिली.या आगीत जखमी झालेली लक्ष्मी बुरा यादव आणि गंभीर जखमी झालेली राजेश्वरी आडे या दोघीही चरितार्थासाठी मुंबईत आल्या व त्यांना या दुर्घटनेचा सामना करावा लागला.

आयपीएल क्रिकेटपटू पॉल वलपथी याची बहीण ग्लोरी वलपथी (४३) व तिचा मुलगा जोसुआ रॉबर्ट (८) हे दोघे इंग्लंडला राहत होते. पॉलच्या आजारी आईला बघण्यासाठी ते मागील आठवड्यातच इंग्लंडहून मुंबईत आले होते. मात्र आजच्या आगीत त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. हा दुःखी प्रकार घडल्यानंतर पॉल व त्याचे नातलग काहीही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्या इमारतीच्या सेक्रेटरींनी देखील आग कशी लागली याबद्दल काही माहिती नसल्याचे सांगितले. मात्र इमारतीची अग्निशामन यंत्रणा व्यवस्थित काम करत होती, असेही ते म्हणाले.

आगीत अत्यंत गंभीर झालेली चोवीस वर्षीय राजेश्वरी आडे ही मूळची यवतमाळ जिल्ह्यातील नारळी गावची आहे. ती काही प्रमाणात अपंग होती तरी तिने जिद्दीने आपले पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले होते. ती गावातील बचत गटातही काम करत होती. तिची उपजत हुशारी पाहून गावातील सरपंच व अन्य जाणत्या व्यक्तींनी अन्य काही अपंग महिलांसह त्यांना यवतमाळच्या सरकारी रुग्णालयात एक महिन्याचे रुग्णांच्या देखभालीचे प्रशिक्षण मिळेल याची व्यवस्था केली. त्यानंतर त्या सर्व मुली एका संस्थेमार्फत हैदराबाद येथे वर्षभर रुग्णांच्या देखभालीच्या कामासाठी गेल्या.

राजेश्वरी तीन-चार महिन्यापूर्वीच मुंबई आली होती. ती येथील रुग्णांची देखभाल करत होती. आजच्या आगीत ती गंभीर जखमी झाली, असे तिचा नातलग प्रवीण मुडे याने सांगितले. तिला जेमतेम दहा ते बारा हजार पगार असेल, घरची परिस्थितीही गरिबीची होती. त्यामुळे घराला मदत करण्यासाठी ती मेहनत करत होती. मात्र इथे आली आणि तिलाही दुर्घटनेला सामोरे जावे लागले असेही प्रवीणाने सांगितले. (Latest Marathi News)

मुंबईतील इमारतीला लागलेल्या आगीत प्रसिद्ध आयपीएल खेळाडूच्या बहीण आणि भाचीचा मृत्यू
Points Table मध्ये मोठी उलथापालथ! अफगाणिस्तानने पाकिस्तानला पराभूत करून इतिहास रचला, विश्वविजेता संघ तळात

तर लक्ष्मी बुरा यादव ही महिला आपल्या पती व मुलांसह गेली चार-पाच वर्षे दक्षिण भारतातील आपल्या गावी होती. तेथे शेतीचे काम करताना त्यांनी छोटे घरही बांधले. त्यावर खूप खर्च झाल्यामुळे पुन्हा पैसे मिळवण्यासाठी ते सर्वजण मुंबईत आले. पंधरा-वीस दिवसापूर्वी मुंबईत आल्यावर तिने पुन्हा सगळीकडे घरकामाला सुरुवात केली होती. पॉल वलपथीच्या घरी देखील लक्ष्मी काम करत होती.

रोज ती आठ दहा घरात काम करते. तिला दोन मुले व एक मुलगी आहे. एक मुलगा व मुलगी गावी शाळेत शिकतात तर वीस वर्षाचा मोठा मुलगा इथे मजुरीचे काम करतो. तिचा नवरा, भाऊ व अन्य नातलगही मुंबईतच मजुरीचे काम करतात, असे तिचा भाऊ व्यंकटआप्पा दुबै आशाप्पा याने सांगितले. (Latest Marathi News)

मुंबईतील इमारतीला लागलेल्या आगीत प्रसिद्ध आयपीएल खेळाडूच्या बहीण आणि भाचीचा मृत्यू
Taiwan Nepal Earthquake: तैवानमध्ये 5.6 रिश्टर स्केल भूकंपाचे तीव्र झटके, नेपाळही हादरलं

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com