नृसिंह मंदिराच्या दरवाज्याला 125 किलो सोन्याची झळाळी

Minister Malla Reddy
Minister Malla Reddyesakal
Updated on
Summary

राज्य सरकारनं सोने खरेदीसाठी रिझर्व्ह बँकेशी (Reserve Bank) करार केला आहे.

हैदराबाद : यदाद्री (तेलंगणा) येथील प्रसिद्ध श्री लक्ष्मी नृसिंह स्वामी मंदिराचे गोपुरम Sri Lakshmi Narasimha Swamy Temple (विशेष द्वार) सोन्याने मढवले जाणार आहे. यासाठी मंदिर व्यवस्थापन 125 किलो सोनं गोळा करत आहे. राज्य सरकारनं सोने खरेदीसाठी रिझर्व्ह बँकेशी (Reserve Bank) करार केलाय. शुद्ध सोनं मिळावं, यासाठी रिझर्व्ह बँकेशी हा करार करण्यात आलाय. सरकारने निधी उभारून रिझर्व्ह बँकेकडून सोने खरेदी करणार असल्याचे म्हटलेय. दरम्यान, राज्याचे मंत्री आणि मुख्यमंत्रीही आपापल्या स्तरावर निधी देत ​​आहेत.

तेलंगणाचे मंत्री मल्ला रेड्डी (Telangana Minister Malla Reddy) यांनी यदाद्रीतील श्री लक्ष्मी नृसिंह स्वामी मंदिराच्या गोपुरमसाठी (Gopuram) 1.75 कोटी रुपये दान केले आहेत. त्यांच्या समर्थकांनी सांगितलं, की मल्ला रेड्डी यांनी मेडचल विधानसभा मतदारसंघाच्या वतीने 1 कोटी रुपये रोख आणि 75 लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केलाय. त्यांच्याशिवाय तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (CM K. Chandrasekhar Rao) यांनी पहिले देणगीदार म्हणून त्यांच्या कुटुंबाच्या वतीने 1.16 किलो सोने दान केले. तसेच तेलंगणातील अनेक मंत्री त्यांच्या सहकाऱ्यांसह यदाद्रीत होणाऱ्या पूजेच्या रॅलीसाठी पोहोचले आहेत. यामध्ये सरथचंद्र रेड्डी, मलकाजगिरी संसद तेरेसा पक्षाचे प्रभारी राजशेखर रेड्डी, माजी आमदार सुधीर रेड्डी, मेडचल मतदारसंघाचे प्रभारी महेंद्र रेड्डी, तेरेसा नेते डॉ. भद्रा रेड्डी आदींचा समावेश आहे.

Minister Malla Reddy
भगवान शंकराच्या 'डमरू'च्या आकाराचा तलाव कुठे आहे माहितीय?

ग्रॅनाइट दगडापासून बनवलेले सर्वात मोठे मंदिर

भगवान विष्णूचा अवतार नृसिंहाचे हे मंदिर ग्रॅनाइट दगडापासून बनवण्यात आलेले देशातील सर्वात मोठे मंदिर आहे. मंदिराचे सर्व दरवाजे आणि भिंती चांदीने मढवलेल्या आहेत. यासाठी सुमारे 1,753 टन चांदी वापरण्यात आलीय. तर हे मंदिर 9 एकर जागेवर पसरलेलं आहे. या मंदिराच्या विस्तारासाठी 1900 एकर जमीन सरकारने 2016 मध्ये 300 कोटींना संपादित केली होती.

Minister Malla Reddy
'जय भीम'चा हिंदी ट्रेलर रिलीज; साऊथ सुपरस्टार दिसणार वकिलाच्या भूमिकेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com