
प्रसिद्ध तबलावादक आणि संगीतकार उस्ताद झाकिर हुसेन हे जागतिक स्तरावर भारतीय शास्त्रीय संगीताचा झेंडा फडकवणारे एक महान कलाकार होते. झाकिर हुसेन यांचे वडील उस्ताद अल्लारखाँ कुरेशी हेदेखील प्रसिद्ध तबलावादक होते. आई बावी बेगम यांचीही साथ त्यांना संगीत साधनेत लाभली. घरातील सांगितिक वातावरणामुळे लहानपणापासूनच झाकिर यांच्या मनात संगीताची ओढ निर्माण झाली.