esakal | कोरोनाग्रस्त रोहित सरदानांचे हार्टअटॅकने निधन

बोलून बातमी शोधा

पत्रकार रोहित सरदाना

टीव्ही पत्रकारीतेच्या क्षेत्रातील मोठा चेहरा

कोरोनाग्रस्त रोहित सरदानांचे हार्टअटॅकने निधन

sakal_logo
By
दीनानाथ परब

नवी दिल्ली: सध्या संपूर्ण देशात कोरोना व्हायरसचा कहर सुरु आहे. कोरोनामुळे देशाच्या वेगवेगळ्या भागात अनेक नागरीक आपल्या प्राणाला मुकत आहेत. आता प्रसिद्ध पत्रकार रोहित सरदाना यांच्या निधनाची मनाला चटका लावून जाणारी बातमी समोर आली आहे. रोहित सरदाना यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. टीव्ही पत्रकारीतेच्या क्षेत्रातील एक मोठे नाव होते.

हेही वाचा: अजून किती लाटा येतील ते सांगू शकत नाही - तात्याराव लहाने

वेगवेगळ्या प्रसिद्ध वृत्त वाहिन्यांवर त्यांनी अँकर म्हणून काम केले होते. स्टुडिओमधून अँकरिंग करताना थेट जनसामान्यांच्या प्रश्नाला हात घालून नेत्यांना बोलते करण्याची कला रोहित सरदाना यांना अवगत होती. त्यांचे अकाली निधन पत्रकारीतेच्या क्षेत्रासाठी एक मोठा धक्का आहे. झी मीडियामध्ये त्यांनी बरीच वर्ष काम केले आहे. 'ताल ठोक के' हा त्यांचा लोकप्रिय डिबेट शो होता.

हेही वाचा: कोव्हॅक्सीनच्या दुसऱ्या डोसला उशीर झाला तर? तात्याराव लहाने म्हणतात...

२०१७ मध्ये झी न्यूज सोडून ते आज तक वृत्तवाहिनीमध्ये रुजू झाले होते. सध्या ते 'दंगल' या डिबेट शो चे सूत्रसंचालन करत होते. रोहित सरदाना हे टीव्ही पत्रकारीतेच्या क्षेत्रातील एक मोठे नाव होते.