Crime News: दोन आरोपींची नावं सारखीच, बलात्कारातला आरोपी सोडून मारहाणीतला आरोपी धरुन ठेवला
Faridabad Police, Name Mix-up, Rape Accused Released: दोन्ही नीतेश हे एकाच तुरुंगात होते. या दोघांच्या वडिलांचेही नाव एकच होते. नावसाधर्म्यामुळे फरिदाबादच्या निमका तुरुंगाचे प्रशासन गोंधळून गेले.
फरिदाबाद: दोघांचे नाव सारखे, मात्र गुन्हा वेगळा. एका व्यक्तीवर मारहाणीचा तर दुसऱ्यावर बलात्काराचा आरोप. पण नाव सारखे असल्यामुळे गोंधळलेल्या पोलिसांनी मारहाण करणाऱ्या आरोपीऐवजी बलात्कार करणाऱ्या आरोपीला सोडून दिले.