भारतीय किसान युनियनमध्ये फूट; राकेश टिकैत केंद्र सरकारवर भडकले, वाचा काय म्हणाले? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rakesh Tikait

कृषी कायद्यांविरोधात दीर्घकाळ लढा देणाऱ्या भारतीय किसान युनियनमध्ये फूट पडलीय.

भारतीय किसान युनियनमध्ये फूट; राकेश टिकैत केंद्र सरकारवर भडकले

नवी दिल्ली : केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात (Central Agricultural Acts) दीर्घकाळ लढा देणाऱ्या भारतीय किसान युनियनमध्ये फूट पडली असून, संघटनेचे अध्यक्ष नरेश टिकैत आणि प्रवक्ते राकेश टिकैत (Rakesh Tikait) या बंधूंची पदावरून उचलबांगडी करण्यात आलीय. संघटनेचे संस्थापक महेंद्रसिंह टिकैत यांच्या स्मृतिदिनीच टिकैत बंधूंना पदावरून हटविण्यात आलंय. संघटनेच्या अध्यक्षपदी राजेश चौहान यांची नियुक्ती करण्यात आलीय. याच पार्श्वभूमीवर भारतीय किसान युनियनचे (Indian Farmers Union) राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर निशाणा साधलाय.

राकेश टिकैत म्हणाले, भारतीय किसान युनियनमध्ये फूट पाडण्यासाठी केंद्र सरकार (Central Government) आणि राजकारणी जबाबदार आहेत. मोदी सरकारचं शेतकऱ्यांच्या आंदोलनाला तोडणं, फूट पाडणं किंवा कमकुवत करणं हे काम आहे. शेतकऱ्यांचा आवाज बुलंद करणं हा आमचा धर्म आहे. त्यामुळं शेतकऱ्यांचा लढा शेवटच्या श्वासापर्यंत सुरू राहणार असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलंय.

हेही वाचा: रशिया-युक्रेन युद्ध काळात भारतीय शेतकरी जगाला मदत करतोय : कृषी मंत्री

महेंद्रसिंह टिकैत यांच्या स्मृतिदिनाचा कार्यक्रम मुझफ्फरनगर जिल्ह्यातील सिसोली गावात सुरू असतानाच, संघटनेतील एका गटानं लखनौमध्ये (Lucknow) बैठक घेतली आणि त्यामध्ये टिकैत बंधूंना पदावरून हटविल्याचं घोषित करण्यात आलं. 'टिकैत बंधूंनी संघटनेला राजकीय स्वरूप देण्याचा प्रयत्न केल्यामुळं त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली,' असं चौहान यांनी सांगितलं. 'संघटनेची उभारणी महत्प्रयासानं करण्यात आलीय. तिचे राजकीयीकरण शेतकऱ्यांना अमान्य आहे. आम्ही अराजकीय संघटना आहोत आणि तसेच राहू इच्छितो. त्यामुळे आम्ही वेगळी संघटना स्थापन करीत आहोत. तिचे नाव भारतीय किसान युनियन (अराजकीय) असेल,' असंही ते म्हणाले. दरम्यान, केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात राकेश टिकैत यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. देशभर फिरून त्यांनी या कायद्यांविरोधात जनमत संघटित केले. मात्र, आंदोलनावेळी; तसेच उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीवेळी त्यांनी राजकीय भूमिका घेतली होती. त्यांनी उघडपणे समाजवादी पक्षाला पाठिंबा जाहीर केला होता.

Web Title: Farmer Leader Rakesh Tikait Criticizes Modi Government

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top