सिंघू बॉर्डरवर पोलिसावर तलवार हल्ला; कार चोरून पळून जाण्याचा प्रयत्न अयशस्वी

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 17 February 2021

दिल्ली पोलिसांच्या एका स्पेशल सेलने लाल किल्ल्यावर 26 जानेवारी रोजी झालेल्या हिंसेसंबंधात आणखी एका प्रमुख आरोपीला पकडले आहे. 

नवी दिल्ली : सिंघु बॉर्डरवर एका आंदोलकाच्या हल्ल्यामध्ये दिल्ली पोलिस दलातील एका SHO ला गंभीर दुखापत झाली आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, हरप्रीत सिंह नावाच्या एका आंदोलकाने एका पोलिस कर्मचाऱ्याची कार बळजबरीने हिसकावून पळून जात होता. जेंव्हा पोलिसांनी त्याचा पाठलाग केला तेंव्हा मुकरबा चौकाच्या जवळ त्याने स्वत: जवळच्या तलवारीने SHO वर हल्ला केला. त्यानंतर त्याने एक स्कूटर चोरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, सरतेशेवटी त्याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी त्या व्यक्तीविरोधात चोरी आणि हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे.  

लाल किल्ल्यावरील हिंसेबाबत आणखी एक आरोपी अटकेत
दिल्ली पोलिसांच्या एका स्पेशल सेलने लाल किल्ल्यावर 26 जानेवारी रोजी झालेल्या हिंसेसंबंधात आणखी एका प्रमुख आरोपीला पकडले आहे. या पकडलेल्या आरोपीचे नाव मनिंदर सिंह उर्फ मोनी (30) आहे. तो एसी मेकॅनिक म्हणून काम करत होता. त्याच्या जवळून दोन तलवारी जप्त करण्यात आल्या आहेत. व्हिडीओ/फेशियल रिकग्निशन द्वारे या आरोपीची ओळख पटवण्यात आली आहे. 

दीप सिद्धूच्या कस्टडीत वाढ
लाल किल्ल्यावरील हिंसेचा मुख्य आरोपी दीप सिद्धूच्या पोलिस कस्टडीत सात दिवसांची वाढ करण्यात  आली आहे. मंगळवारी दिल्ली पोलिसांनी त्याला मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेटसमोर सादर केलं होतं. पोलिसांनी आरोप ठेवला होता की, तो झुंडीला चिथावणी देत होता. तो हिंसा करणाऱ्यांपैकी एक आहे. 

टीकरी बॉर्डरव आणखी एका शेतकऱ्याचा मृत्यू
टीकरी बॉर्डरवर काल मंगळवारी आणखी एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. शेतकरी नेत्यांनी दावा केलाय की, बॉर्डरवर आतापर्यंत 20 हून अधिक शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: farmer protest delhi police sho attcked red fort riot maninder singh moni arrested