esakal | Farmer Protest : शक्तीप्रदर्शनानंतर चर्चेची 8वी फेरी: बाबा लक्खा सिंग यांची कृषी मंत्र्यांशी भेट
sakal

बोलून बातमी शोधा

farmers

नव्या कृषी कायद्यांच्या मुद्यावर केंद्र सरकारशी होणाऱ्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर, गुरुवारी शेतकरी संघटनांनी ट्रॅक्टर मोर्चा काढून शक्तिप्रदर्शन केले.

Farmer Protest : शक्तीप्रदर्शनानंतर चर्चेची 8वी फेरी: बाबा लक्खा सिंग यांची कृषी मंत्र्यांशी भेट

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : नव्या कृषी कायद्यांच्या मुद्यावर केंद्र सरकारशी होणाऱ्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर, गुरुवारी शेतकरी संघटनांनी ट्रॅक्टर मोर्चा काढून शक्तिप्रदर्शन केले. ही 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाला केल्या जाणाऱ्या मोठ्या शक्ती प्रदर्शनाची रंगीत तालीमच म्हटली जात आहे. आज शेतकरी आणि सरकार यांच्यात चर्चेची आठवी फेरी  होत आहे. 

नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन करत असणाऱ्या शेतकरी संघटनांशी आज शुक्रवारी होणाऱ्या चर्चेआधी केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी बाबा लक्खा सिंह तोमर यांची काल गुरुवारी भेट घेतली. पंजाबच्या नानकसर गुरुद्वारा, कलेराचे प्रमुख लक्खा सिंह यांना चर्चेसाठी मध्यस्थ म्हणून भुमिका बजावण्याची विनंती त्यांनी केली आहे. यावेळी त्यांनी म्हटलंय की आम्ही दहा पावले पुढे आलो आहोत तर आता शेतकरी संघटनांना देखील थोडं पुढं यायला हवं.

शेतकरी जर कृषी कायद्यांना रद्द करण्याचा हेका सोडून इतर अन्य काही प्रस्ताव देत असतील तर सरकार त्यावर जरुर विचार करेल. तर  दुसरीकडे बाबा लक्खा यांनी म्हटलंय की, आम्ही नवा प्रस्ताव घेऊन येऊ तसेच या मुद्यावर लवकरात लवकर उपाय शोधण्याचा प्रयत्न करु.

बाबा लक्खा यांच्याशी झालेल्या बातचितीनंतर कृषी मंत्र्यांनी कसल्याही प्रकारचे वक्तव्य करण्यास नकार दिला आहे. त्यांनी म्हटलंय की, विज्ञान भवनात दुपारी दोन वाजता आंदोलन करणाऱ्या 40 शेतकरी संघटनांशी बातचितीचा काय निष्कर्ष निघेल, हे सांगता येत नाही. तसेच त्यांनी बाबा लक्खा यांना कसल्याही प्रकारच्या प्रस्तावाला देण्याबाबतही सांगण्यास नकार देत म्हटलं की मी आता काहीच सांगू शकत नाही. पुढे त्यांनी म्हटलं की, बाबा लक्खा यांच्यासोबत कसल्याही प्रस्तावाबाबत चर्चा झालेली नाहीये. 

तर दुसरीकडे तोमर यांच्याशी झालेल्या भेटीनंतर लक्खा सिंह यांनी म्हटलं की, लोकांचे जीव जात आहेत. मुले, शेतकरी, वयस्कर लोक रस्त्यावर आहेत. ते प्रतिकूल परिस्थितीत आहेत. यासाठी मी कृषी मंत्र्यांशी भेट घेतली. आम्ही सरकार आणि शेतकऱ्यांनी विनंती केलीय की त्यांनी लवकरात लवकर तोडगा काढावा.


 

loading image