Farooq Abdullah Resigns : फारुख अब्दुल्लांचा नॅशनल कॉन्फरन्सच्या अध्यक्षपदाचा राजीनामा; काय घडलंय जाणून घ्या

85 वर्षीय अब्दुल्ला आता पक्षाच्या संरक्षकाची भूमिका स्वीकारतील
Farooq Abdullah
Farooq Abdullahesakal

Jammu & Kashmir: जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला (Farooq Abdullah) यांनी शुक्रवारी नॅशनल कॉन्फरन्सच्या (NC) अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली. आता नव्या पिढीवर जबाबदारी सोपवण्याची वेळ आली आहे. असं कारण देत त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

हेही वाचा- का आहे जैन आणि हिंदु धर्मियांत साहचर्य?

85 वर्षीय अब्दुल्ला आता पक्षाच्या संरक्षकाची भूमिका स्वीकारतील तर त्यांचा मुलगा आणि एनसीचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला हे पक्षाचे नवे प्रमुख बनतील. तर अब्दुल्ला म्हणाले की, 'मी यापुढे अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवणार नाही. या पदासाठी ५ डिसेंबर रोजी निवडणूक होणार आहे. आता ही जबाबदारी नव्या पिढीने उचलण्याची वेळ आली आहे, पक्षाचा कोणताही सदस्य या पदासाठी निवडणूक लढवू शकतो ही एक लोकशाही प्रक्रिया आहे."

फारुख अब्दुल्ला 1983 मध्ये पहिल्यांदा नॅशनल कॉन्फरन्सचे (NC) अध्यक्ष झाले. फारुख अब्दुल्ला हे या प्रदेशातील सर्वात जुन्या पक्षाचे प्रमुख होते, ज्याने 1947 मध्ये जम्मू आणि काश्मीरचा भारतात सहभागी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.

Farooq Abdullah
MNS agitation against Rahul Gandhi : सावरकरविरोधी वक्तव्यावरुन मनसे आक्रमक; राहुल गांधी मुर्दाबादच्या दिल्या घोषणा
Farooq Abdullah
'मी RSS चा अजेंडा चालवत नाहीये, सिद्ध केलं तर राजीनामा देईन'; आरोपानंतर राज्यपाल संतापले

सध्या नॅशनल कॉन्फरन्स जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीची तयारी करत आहे. कलम ३७० रद्द केल्यानंतर आणि जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा मिळाल्यानंतरच्या या पहिल्या विधानसभा निवडणुका असतील.

फारुख अब्दुल्ला यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने जम्मू-काश्मीरच्या घटनात्मक दर्जात बदल आणि मतदार यादीत बाहेरील लोकांच्या कथित समावेशाविरोधात प्रचार केला आहे. मतदार यादीत बाहेरील व्यक्तींचा समावेश करणे हा प्रदेशाची लोकसंख्या बदलण्याच्या कथित डावपेचाचा एक भाग असल्याचा पक्षाचा आरोप त्यांनी केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com