esakal | "मला फाशी झाली तरी चालेल, पण जम्मू-काश्मीरचा लढा सुरुच राहणार"
sakal

बोलून बातमी शोधा

Farooq Abdullah

नॅशनल कॉन्फरन्सचे नेते आणि माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला अडचणीत आले आहेत.

"मला फाशी झाली तरी चालेल, पण जम्मू-काश्मीरचा लढा सुरुच राहणार"

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली- नॅशनल कॉन्फरन्सचे नेते आणि माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला अडचणीत आले आहेत. आज सक्तवसुली संचालनालयाकडून Enforcement Directorate (ED) त्यांची चौकशी करण्यात आली. जम्मू-काश्मीर क्रिकेट असोशियशनमधील Jammu and Kashmir Cricket Association (JKCA) घोटाळ्याप्रकरणी त्यांना ईडीने प्रश्न विचारले आहेत. चौकशीनंतर माध्यमांना प्रतिक्रिया देताना फारुख अब्दुल्ला यांनी केंद्र सरकारवर टीका करतानाच जम्मू-काश्मीरच्या लोकांसाठी अखेरपर्यंत लढणार असल्याचे म्हटलं आहे. 

फारुख अब्दुल्ला म्हणाले की, अशाप्रकारची चौकशी अनेक वर्ष चालणार आहे. हे काही नवीन नाही. मी यावर काहीही बोलणार नाही. न्यायालय यावर काय निर्णय घ्यायचाय तो घेईल. मला कसलीही काळजी नाही, असं ते म्हणाले आहेत. अब्दुल्ला यांनी यावेळी मोदी सरकारवरही टीका केली. आम्हाला मोठी आणि दिर्घकाळ चालणारी लढाई लढायची आहे. फारुख अब्दुल्ला जीवंत असेल किंवा नसेल पण लढाई सुरुच राहिल. जोपर्यंत जम्मू-काश्मीरला विषेश दर्जा देणारे कलम पुन्हा लागू होत नाही, तोपर्यंत आम्ही थांबणार नाही. मी फाशी जाईलाही तयार आहे, असं ते म्हणाले आहेत. 

दरम्यान, मागील वर्षी 5 ऑगस्टला जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 हटवण्यात आले होते. त्यानंतर जम्मू-काश्मीरमधील नेत्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले. यामध्ये फारुख अब्दुल्ला, ओमर अब्दुल्ला, माजी मुख्यमंत्री मेहमुबा मुफ्ती यासारख्या नेत्यांचा समावेश होता. सर्व नेत्यांची आता सुटका करण्यात आली आहे. 
जम्मू-काश्मिरचा विशेष दर्जा काढल्याच्या विरोधात सहा पक्षाच्या नेत्यांनी फारुख अब्दुल्ला यांच्या निवासस्थानी बैठक घेतली होती. यावेळी पीडीपी अध्यक्ष मेहमुबा मुफ्ती, पीपल्स कॉन्फरन्स अध्यक्ष साजद लोन, पीपल्स मुव्हमेंटचा नेता जावेद मीर, सीपीआय(एम) नेता मोहम्मद युसूफ तारीगामी आणि आवामी नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष मुझफर शहा उपस्थित होते. मेहबुबा मुफ्ती यांची केंद्र सरकारने सुटला केल्यानंतर दोन दिवसांनी ही बैठक बोलावण्यात आली होती.