
Farooq Abdullah
sakal
लडाखला राज्याचा दर्जा देण्याची आणि घटनात्मक हक्कांचे संरक्षण करण्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला काल झालेल्या हिंसेचे गालबोट लागल्याबद्दल नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष डॉ. फारुक अब्दुल्ला यांनी गुरुवारी चिंता व्यक्त केली. बळाचा वापर न करता संवादाचा मार्ग स्वीकारत लडाखच्या समस्या सोडविण्याचे आवाहन त्यांनी गुरुवारी केंद्र सरकारला केले.