

Female Judge Files Dowry FIR in Farrukhabad
esakal
Dowry Harassment and Assault Claims : उत्तर प्रदेशातील फर्रुखाबाद येथे 'ग्राम न्यायालयात' कार्यरत असलेल्या एका महिला न्यायाधीशाने, मर्चंट नेव्हीमध्ये अभियंता असलेल्या आपल्या पतीविरुद्ध आणि त्याच्या कुटुंबीयांविरुद्ध ३० लाख रुपयांच्या हुंड्याची मागणी केल्याप्रकरणी एफआयआर दाखल केला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. तक्रारदार महिलेचा आरोप आहे की, विवाह निश्चित झाल्यापासूनच तिचा पती आणि त्याचे कुटुंबीय हुंड्याची मागणी करू लागले होते. काही प्रमाणात हुंडा दिला गेला असला, तरी त्यांच्या मागण्या वाढतच गेल्या.