
Online FASTag Registration: भारत सरकारने फास्टटॅग वापरकर्त्यांसाठी एक नवी सुविधा जाहीर केली आहे. १५ ऑगस्ट २०२५ पासून देशभरातील वाहनधारकांसाठी वार्षिक फास्टटॅग पास उपलब्ध होणार आहे. जे नागरिक नियमितपणे एका विशिष्ट टोल नाक्यावरून प्रवास करतात, त्यांच्या वेळ आणि पैशांची बचत व्हावी या उद्देशाने ही योजना राबवली जात आहे. तुम्हीही हा पास घेण्याचा विचार करत असाल, तर खरेदी करण्यापूर्वी ‘हे’ ११ महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची उत्तरं नक्की वाचा!