FASTag ची गाडी सूसाट; दिवसात 103 कोटींचे कलेक्शन

fastag
fastag
Summary

देशात कोरोना महामारीचा प्रकोप कमी झाला आहे. त्यामुळे आर्थिक घडामोडी पूर्वपदावर येऊ लागल्या आहेत. लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आली आहे.

नवी दिल्ली- देशात कोरोना महामारीचा प्रकोप कमी झाला आहे. त्यामुळे आर्थिक घडामोडी पूर्वपदावर येऊ लागल्या आहेत. लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. महामार्गांवरील दळणवळण वाढले आहे. त्यामुळे फास्टॅगच्या (Fastag) माध्यमातून गोळा करण्यात येणारा टोल रिकॉर्ड स्तरावर पोहोचला आहे. 1 जुलैला फास्टॅगच्या माध्यमातून 103.54 कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. फास्टॅगच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक टोल जमा करण्याचे काम 780 टोल केंद्रावर सुरु आहे. जून महिन्यात एकूण टोल 2,576.28 कोटी रुपये झाला आहे, मे महिन्यात वसूल करण्यात आलेल्या 2,125.16 कोटी रुपयांच्या तुलनेत तो 21 टक्क्यांनी जास्त आहे. (FASTag toll data shows traffic back on highways Rs 103 crore collected on July 1 )

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिजिटल इंडियाच्या दृष्टीकोणातून या महत्त्वाकांक्षी प्रोजेक्टची सुरुवात केली होती. डिजिटल इंडियाला 1 जूलै 2021 ला 6 वर्ष पूर्ण होत आहेत. डिजिटल इंडियाच्या अंतर्गत सर्व सरकारी टोल प्लाझांवर होणाऱ्या देवाण घेवाणीला डिजिटल करण्यासाठी सरकारने फेब्रुवारी महिन्यात फास्टॅग लागू केला होता. यामुळे फक्त वेळ वाचणार नाही, तर यामुळे इंधनात बचत होईल असं सांगण्यात आलं.

fastag
भीमराव तापकीरांना दोन डोस घेऊनही कोरोनाची लागण

96 टक्के होतोय फास्टॅगचा वापर

जवळपास 3.48 कोटी वापरकर्त्यांसोबत देशभरात 96 टक्के लोग फास्टॅगचा वापर करत आहेत. अनेक टोल प्लाझावर याचा वापर 99 टक्क्यांपर्यंत होत आहे. एका अंदाजानुसार, फास्टॅग दरवर्षी इंधनावर 20 हजार कोटी रुपयांची बचत करेल. यामुळे विदेशी चलन वाचेल आणि पर्यावरणाचे संरक्षण होण्यास मदत होईल. फास्टॅगचा वापर वाढत गेल्यास टोल प्लाझावर प्रतिक्षा करण्याच्या वेळेत घट होऊ शकते.

fastag
काँग्रेसचाही स्वबळावर लढण्याचा निर्धार

मागील महिन्यात झाली होती घट

मे महिन्यात राष्ट्रीय महामार्गांवर टोल कलेक्शनमध्ये घट झाली होती. रेटिंग एजेन्सी इक्रानुसार, राष्ट्रीय महामार्गावर (NH) टोल संग्रहामध्ये मे महिन्यात 25 ते 30 टक्क्यांच्या घटीची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. मार्च महिन्याच्या तुलनेत एप्रिल महिन्यात टोल कलेक्शनमध्ये 10 टक्के घट झाली होती. कोरोना महामारीच्या थैमानामुळे देशात लॉकडाऊन करण्यात आला होता. त्यामुळे दळणवळणावर निर्बंध आले होते. त्यामुळे टोल कलेक्शनमध्ये घट नोंदवण्यात आली होती. पण, आता कोरोना निर्बंध हळूहळू कमी करण्यात येत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा टोल कलेक्शन वाढण्याची शक्यता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com