
Uttar Pradesh Crime News: रक्ताच्या नात्याला फासला कलंक! बापानं स्वतःच्याच 7 वर्षाच्या मुलीवर केला बलात्कार, आईनं दाबलं चिमुरडीचं तोंड
लखनऊ : उत्तर प्रदेशच्या बरेलीमधून (Uttar Pradesh Bareilly) नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आलीये. इथं एका बापानं नात्याच्या सर्व सीमा ओलांडत आपल्या 7 वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केले. धक्कादायक बाब म्हणजे यात आरोपीच्या पत्नीनंही त्याची साथ दिलीये.
हेही वाचा: Russia-Ukraine युध्दाबाबत मोठी बातमी! व्लादिमीर पुतीन युक्रेनसोबत चर्चेसाठी तयार, पण 'ही' घातली अट
ही महिला चिमुकलीची सावत्र आई आहे. या प्रकरणी नातेवाईकांच्या तक्रारीनंतर, पोलिसांनी आरोपी बाप आणि सावत्र आईला अटक करुन त्यांच्याविरुध्द गुन्हा दाखल केलाय. आरोपी वडील कोरोना काळात पॉक्सो कायद्यांतर्गत (POCSO Act) तुरुंगात गेले होते. तिथून सुटका झाल्यानंतर त्यानं आपल्या स्वतःच्याच मुलीवर बलात्कार केलाय.
हेही वाचा: Ayodhya Ram Temple : अयोध्येतील राम मंदिर उद्धस्त करुन, त्या जागी पुन्हा बाबरी मशीद बांधणार; अल कायदाची थेट धमकी
इतकंच नाही तर या घटनेत पीडितेच्या सावत्र आईनं पतीला पूर्ण पाठिंबा दिला. मुलगी ओरडल्यास तिचा आवाज बाहेर जाऊ नये, यासाठी तिनं चिमुकलीचं तोंड दाबून ठेवलं.
याबाबत एसपी देहत राजकुमार अग्रवाल यांनी सांगितलं की, बहेडी पोलीस स्टेशन (Baheri Police Station) हद्दीतील एका गावामधील एका व्यक्तीनं याप्रकरणी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.
या व्यक्तीच्या भाचीवर तिच्याच वडिलांनी बलात्कार केला. या जबाबाच्या आधारे आरोपी आणि त्याच्या पत्नीला अटक करण्यात आलीये.