मुलाच्या प्रेयसीवर गेली बापाची वाईट नजर अन्...

वृत्तसंस्था
सोमवार, 3 फेब्रुवारी 2020

मुलाच्या प्रेयसीवर बापाची वाईट नजर गेली आणि बलात्कार केल्यानंतर तिच्या गळ्यात मंगळसूत्र बांधण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी पोलिसांनी नित्यानंदम (वय 42) याला अटक केली आहे.

नागपट्टीनम (तामिळनाडू): मुलाच्या प्रेयसीवर बापाची वाईट नजर गेली आणि बलात्कार केल्यानंतर तिच्या गळ्यात मंगळसूत्र बांधण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी पोलिसांनी नित्यानंदम (वय 42) याला अटक केली आहे. वेदारनयम येथे घडलेल्या घटनेमुळे राज्यात खळबळ उडाली आहे.

प्रेमी युगलाने केला 'तो' व्हिडिओ व्हायरल अन्...

नित्यानंदम हा सेम्बोडाई येथे कपड्यांचे दुकान चालवतो. त्याला मदत केल्याप्रकरणी अन्य दोघांनाही अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नित्यानंदनचा मुलगा आयआयटीचे शिक्षण घेत होता. यावेळी चेन्नई येथील एका युवतीसोबत (वय 20) त्याची मैत्री झाली. मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. नित्यानंदमला आपल्या मुलाच्या प्रेमसंबंधांबाबत समजले. दोघांना एकमेकांपासून वेगळे करण्याचा त्यान कट रचला. युवतीशी संपर्क करून तुझ्या आणि माझ्या मुलाच्या लग्नाबाबत तुझ्याशी बोलायचे आहे, असे सांगून सेम्बोडाई येथे बोलवून घेतले. युवती सेम्बोडाई येथे आल्यावर नित्यानंदमने तिचा मोबाईल हिसकाऊन घेतला आणि बलात्कार केला. बलात्कारानंमतर त्याने तिच्या गळ्यात जबरदस्तीने मंगळसूत्र अडकवण्याचा प्रयत्न केला. बलात्कारानंतर पीडित युवतीला घेऊन मित्र सकथिवेल याच्या अवुरिकाडू येथील घरी गेला. तेथे दोन दिवस युवतीला बंद करून ठेवले.

नवऱयाने दोघांना 'त्या' अवस्थेत पकडले मग...

दरम्यान, नित्यानंदमच्या मुलगा एन मुकेश कन्नान याला या घटनेबाबत माहिती मिळाली. तो तत्काळ अवुरिकाडू येथे गेला आणि प्रेयसीची सूटका केली आणि पोलिसांकडे गेला. पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर नित्यानंदम अटक केली. पुढील तपास पोलिस करत आहेत.

व्याही-विहीणच्या प्रेमात आणखी एक ट्विस्ट...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: father harassment sons girlfriend at tamilnadu