esakal | निर्जंतुकीकरण काही तासांत

बोलून बातमी शोधा

Drone

ड्रोनची वैशिष्ट्ये

  • स्प्रेयर सिस्टिम केवळ एका ऑपरेटरच्या माध्यमातून नियंत्रित केली जाऊ शकते
  • निर्जंतुकीकरणाचे व्हिडिओ रेकॉर्डिंग शक्य
  • स्वच्छतेमधील मानवी सहभाग संपुष्टात येणार
  • सोशल डिस्टन्सिंगला पूरक यंत्रणा
  • या ड्रोनचा अपघात होऊ शकत नाही, स्वत:हून उंची ॲडजेस्ट करण्याची क्षमता
निर्जंतुकीकरण काही तासांत
sakal_logo
By
पीटीआय

नवी दिल्ली - विस्तीर्ण प्रदेशांचे निर्जंतुकीकरण करण्याची क्षमता असणारे एक अत्याधुनिक ड्रोन आयआयटी गुवाहाटीच्या विद्यार्थ्यांनी विकसित केले आहे. या ड्रोनला एक स्वयंचलित स्प्रेयर बसविण्यात आले असून त्या माध्यमातून फूटपाथ, उद्याने आणि रस्ते यांचे निर्जंतुकीकरण करता येऊ शकेल.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

या विद्यार्थ्यांनी ‘रेसरफ्लाय’ नावाचे स्टार्टअप तयार केले असून त्यांनी आसाम आणि उत्तराखंड सरकारला मदत करण्याची तयारी दर्शविली आहे. सर्वसाधारणपणे मोठ्या परिसरांचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी दीड दिवस लागतो पण या ड्रोन स्प्रेयरच्या माध्यमातून हेच काम केवळ पंधरा मिनिटांत होऊ शकते.

४ लीटर औषधाची १ मिनिटांत फवारणी
२० कामगारांचे काम १ ड्रोन करेल

सरकारने आमच्या प्रकल्पास मान्यता दिली तर आम्ही पंधरा ते वीस दिवसांमध्ये अशा प्रकारचे पंधरा ड्रोन तयार करू शकतो तर महिनाभरात अशा पन्नास ड्रोनची निर्मिती करता येईल.
- अनंत मित्तल, अभियांत्रिकी शाखेचे विद्यार्थी

गुगल मॅपचा आधार
गुगल मॅपच्या माध्यमातून विशिष्ट परिसर निश्‍चित करण्यात येईल, त्यानंतर तीन किलोमीटरपर्यंतचा परिसराचे निर्जंतुकीकरण करण्यात येईल. एकाच उड्डाणात हे ड्रोन १.२ हेक्टरपर्यंतच्या परिसराचे निर्जंतुकीकरण करेल.  दिवसभरात ते ६० हेक्टरपर्यंतचा परिसर निर्जंतुक करू शकेल.