esakal | Coronavirus : सोशल डिस्टिन्सिंगसाठी सिनेसृष्टी एकवटली
sakal

बोलून बातमी शोधा

Film-Industry

फिर मुस्कुराएगा इंडिया
सध्या देशभर एक नैराश्‍याचे मळभ दाटलेले दिसून येते, ते दूर व्हावे म्हणून सिनेसृष्टीतील कलावंतांनी ‘फिर मुस्कुराएगा इंडिया’ हे व्हिडिओ साँग तयार केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्विटरवरून या व्हिडिओ साँगचे कौतुक केले आहे. अक्षयकुमार, कार्तिक आर्यन, टायगर श्रॉफ, तापसी पन्नू, कियारा अडवानी आदी मंडळींचा यात समावेश आहे.

Coronavirus : सोशल डिस्टिन्सिंगसाठी सिनेसृष्टी एकवटली

sakal_logo
By
वृत्तसंस्था

‘फॅमिली’या लघूपटातून संदेश, प्रसून पांडेंची संकल्पना
नवी दिल्ली - सध्या कोरोनाच्या संसर्गामुळे सामाजिक विलगीकरण अर्थात सोशल डिस्टन्सिंगला खूप महत्त्व प्राप्त झाले आहे. लोकांमध्ये याच डिस्टन्सिंगचे महत्त्व रुजावे, त्यांनी घरी थांबावे आणि स्वच्छता ठेवावी असा संदेश देणारा ‘फॅमिली’ नावाचा एक लघुपट बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी आज प्रदर्शित केला.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

या लघुपटाची संकल्पना मांडण्याबरोबरच त्याच्या व्हर्च्युल दिग्दर्शन करण्याची जबाबदारी ही प्रसून पांडे यांनी पेलली आहे. या लघुपटामध्ये रजनीकांत, रणबीर कपूर, प्रियांका चोप्रा, आलिया भट्ट, चिरंजीवी, मोहनलाल, मामूट्टी, सोनाली कुलकर्णी, शिवराज कुमार आणि प्रसेनजित चॅटर्जी या दिग्गज मंडळींचा समावेश आहे. अमिताभ बच्चन यांनी आज त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर या लघुपटाचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. पूर्णपणे घरातच हा लघुपट बनविण्यात आला असून सोमवारी रात्री सोनी नेटवर्कवरून तो प्रसारित करण्यात आला. या लघुपटाच्या चित्रीकरणातही प्रत्येक कलाकाराने घरातच चित्रीकरण केले आहे.