कपाटात मांजर लपली आहे, शोधा बरं...

वृत्तसंस्था
Wednesday, 10 June 2020

एका कपाटामध्ये मांजर लपली आहे. नेटिझन्स या मांजराला शोधण्याचा प्रयत्न करत असून, सुरवातीला सापडत नाही. पण, व्यवस्थित पाहिल्यानंतर मांजर दिसते. सोशल मीडियावर छायाचित्र व्हायरल झाले आहे.

नवी दिल्ली: एका कपाटामध्ये मांजर लपली आहे. नेटिझन्स या मांजराला शोधण्याचा प्रयत्न करत असून, सुरवातीला सापडत नाही. पण, व्यवस्थित पाहिल्यानंतर मांजर दिसते. सोशल मीडियावर छायाचित्र व्हायरल झाले आहे.

अनेकजण पाळीव प्राण्यांवर कुटुंबातील सदस्य म्हणून प्रेम करतात. पाळीव प्राणीही जीवाला जीव देण्यास मागे-पुढे पाहात नसल्याच्या बातम्या वाचायला मिळतात. यामध्ये कुत्रा असो वा मांजर. पत्रकार असलेल्या केट हिंड्स यांनी ट्विटवर कपाटाचे छायाचित्र शेअर केले असून, आपली मांजर कुठे लपली आहे, हे शोधण्यास सांगितले. छायाचित्र व्हायरल होऊ लागल्यानंतर नेटिझन्स मांजरीचा शोध घेत आहेत. अनेकांनी मांजरीला शोधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना मांजर काही सापडली नाही. काही जणांना सुरुवातीला सापडली नाही पण काही वेळानंतर मांजर सापडलीच.

पण, ही मांजर नेमकी कुठे लपली आहे, याबद्दल केट यांनी शेवटी सांगितले आहे. कपाटातील तो टीव्ह नीट पाहा. बरोबर त्याच्या खाली पांढरीशुभ्र मांजर लपून बसली आहे. मांजरीने लपाछपीच्या या खेळात नेटिझन्सना खेळवून ठवले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: find the cat twitter fun time trying to spot feline in this viral post