Video : सात डोक्यांचा साप पाहण्यासाठी गर्दी...

वृत्तसंस्था
गुरुवार, 10 ऑक्टोबर 2019

साप पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. सोशल मीडियावर सात डोक्यांच्या सापाच्या कातीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

बंगळूरू (कर्नाटक): कनकपूर गावामध्ये असलेल्या एका मंदिराच्या परिसरामध्ये सात डोकी असलेल्या सापाची कात आढळून आली असून, साप पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. सोशल मीडियावर सात डोक्यांच्या सापाच्या कातीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

स्थानिक प्रसारमाध्यमे व वृत्त वाहिन्यांनी सात डोक्याच्या सापाबद्दल वृत्त दिल्यामुळे नागरिकांमध्ये उत्सुकता लागली आहे. अनेकंनी कनकपूर गावाकडे धाव घेतली आहे. व्हिडिओही मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. सहा महिन्यांपूर्वीही सात डोक्यांच्या सापाची कात आढळून आली होती. ग्रामस्थांनी सापाची कात सापडलेल्या जागी मंदिराची उभारणी केली आहे. पण, बुधवारी (ता. 9) दुसऱयांदा मंदिराजवळच दुसरी कात सापडली आहे. सापाच्या कातीची लांबी 10 फूट असून, सात डोके आहेत, असे ग्रामस्थांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

दरम्यान, सर्पमित्रांनी सात डोक्यांचा सापाच्या अस्तित्त्वाची शक्यता फेटाळून लावली आहे. दोन डोक्यांचा साप असू शकतो. मात्र, त्याची शक्यतादेखील फार विरळ आहे. माणसांमध्ये जसे क्वचित दोन डोक्यांची जुळी मुलं जन्म घेतात. त्याप्रमाणेच हा प्रकार सापांमध्ये आढळून येऊ शकतो, असे मत सर्पमित्र रामू पी प्रसारमाध्यमांशी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Find Seven Headed Snake Skin at karnataka Video Is Viral