Kasganj Custodial Death: कासगंज पोलिस ठाण्यातील मृत्युप्रकरणी एफआयआर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kasganj Custodial Death: कासगंज पोलिस ठाण्यातील मृत्युप्रकरणी एफआयआर

Kasganj Custodial Death: कासगंज पोलिस ठाण्यातील मृत्युप्रकरणी एफआयआर

sakal_logo
By
अक्षय साबळे

नवी दिल्ली/लखनौ : कासगंज पोलिस ठाण्यातील आरोपीच्या मृत्यूप्रकरणी प्राथमिक चौकशी अहवाल (एफआयआर) शनिवारी उशिरा दाखल करण्यात आला. अल्ताफ या २२ वर्षीय कामगाराने स्वच्छतागृहात आत्महत्या केल्याचा पोलिसांचा दावा आहे.

नागला सईद परिसरात राहणाऱ्या अल्ताफला एक अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याप्रकरणी चौकशीसाठी पोलिस ठाण्यात आणण्यात आले होते. त्याच्याविरुद्ध मुलीच्या कुटुंबीयांनी तक्रार केली होती. एफआयआरमध्ये अज्ञात पोलिस असाच उल्लेख आहे. अधिक चौकशीनंतर नावे घालण्यात येतील असे सांगण्यात आले. अल्ताफचे वडील चाँद मियाँ यांच्या तक्रारीनंतर एफआयआर दाखल करण्यात आला.

स्वच्छतागृहात अल्ताफने पाण्याच्या नळाच्या पाईपला जॅकेटवरील टोपीची दोरी बांधून गळफास घेतल्याचा पोलिसांना दावा आहे. चाँद मियाँ यांनी सुरवातीला पोलिस निर्दोष असल्याचे सांगितले होते. नंतर मात्र आपल्याला भाग पाडण्यात आले असा आरोप त्यांनी केला.

त्यांनी सांगितले की, स्वच्छतागृहातील नळ सुमारे दोन फूट उंचीवर आहे. माझ्या मुलाची उंची पाच फूटापेक्षा जास्त होती. मी कोणत्याही अधिकाऱ्याशी तडजोड केलेली नाही. कोऱ्या कागदावर अंगठा उमटविण्यास मला भाग पाडण्यात आले. याप्रकरणी कारवाई व्हावी अशी माझी विनंती आहे.

loading image
go to top