
गर्लफ्रेंडसोबतचा व्हिडिओ पॉर्न साईटवर, तरुणाला बसला धक्का
बंगळुरू : गर्लफ्रेंडसोबतच्या खासगी क्षणांचा व्हिडिओ पॉर्न वेबसाईटवर सापडल्याने एका तरुणाला धक्का बसला आहे. २५ वर्षीय तरुणानं पोलिस ठाण्यात (Austin Police station) धाव घेत कारवाई करण्याची मागणी केली आहे. ही घटना ऑस्टीन (Austin Town Bengaluru) शहरात घडली आहे.
हेही वाचा: पेण हादरलं! अल्पवयीन मुलीवर दहा जणांकडून सामूहिक बलात्कार; सात जणांना अटक
तरुणाने काही दिवसांपूर्वी बंगळुरूमधील हॉटेलमध्ये आपल्या गर्लफ्रेंडसोबत रात्र घालवली होती. यावेळी कोणीतरी आमच्या खासगी क्षणांचे व्हिडिओ काढले आणि पॉर्न वेबसाईटवर अपलोड केले. जेव्हा तरुणाने या वेबसाईटला भेट दिली तेव्हा त्याला धक्का बसला. कारण, त्याचा आणि त्याच्या गर्लफ्रेंडचा व्हिडिओ तिथे दिसला. इतकेच नाहीतर इतर वेबसाईटवर देखील हा व्हिडिओ दिसला, असं तरुणाने तक्रारीमध्ये सांगितलं आहे. त्यानुसार सायबर क्राईम पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
व्हिडिओमध्ये दोघांचेही चेहरे ब्लर करण्यात आले आहेत. मात्र, शरीरावरील इतर भागांवर असलेल्या जन्मखुणांवरून हा व्हिडिओ आपला असल्याचा दावा तरुणाने केला आहे. अपलोड केलेला व्हिडिओ गुप्तपणे शूट केला गेला नाही असा संशय पोलिसांना आहे. कारण त्यात वेगवेगळ्या अँगलने व्हिडिओ शूट करण्यात आला आहे. या प्रकरणाची दखल घेतली असून तपास सुरू आहे, असं पोलिसांनी सांगितलं.
Web Title: Fir File Against Unknown In Man Found Own Private Video With Girlfriend On Porn Website Case
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..