100 कोटींवर 15 कोटी भारी म्हणणाऱ्या वारिस पठाणांवर गुन्हा

वृत्तसंस्था
शनिवार, 22 फेब्रुवारी 2020

वारिस पठाण यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर कलबुर्गी पोलिसांनी कलम 117,153 (दंगलीसाठी भडकावना) आणि कलम 153 ए (दोन समाजात तेढ निर्माण करणे) अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. 

बंगळूर : देशातील शंभर कोटींवर पंधरा कोटी भारी पडतील, असे वाद्ग्रस्त वक्तव्य करणारे एमआयएमचे नेते वारिस पठाण यांच्याविरोधात कलबुर्गी पोलिसांनी गुन्हा दाखल झाला आहे.

वारिस पठाण हे वक्तव्य केल्यानंतर वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. गुलबर्गा येथील आयोजित सभेत बोलताना त्यांनी ही गरळ ओकली होती. विशेष म्हणजे या वेळी व्यासपीठावर पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी हेदेखील उपस्थित होते. मुस्लिम समुदायाला स्वातंत्र्य देण्यात आले नाही तर ते त्यांना हिसकावून घ्यावे लागेल, असे सांगताना पठाण म्हणाले की, ‘‘आम्ही आमच्या माता, भगिनींना पुढे करून स्वत: मात्र लपून बसल्याचा दावा काही जण करत आहेत; पण प्रत्यक्षात मात्र आता फक्त सिंहीणीच रस्त्यावर उतरल्या असताना तुम्हाला घाम फुटला आहे. कल्पना करा आम्ही सर्व रस्त्यावर उतरलो तर काय होईल. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. पंधरा कोटी हे शंभर कोटींना भारी पडतील.’’

वारिस पठाण यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर कलबुर्गी पोलिसांनी कलम 117,153 (दंगलीसाठी भडकावना) आणि कलम 153 ए (दोन समाजात तेढ निर्माण करणे) अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. 

वारिस पठाण यांनी त्यांच्या वक्तव्याबद्दल माफी मागावी, ते तसे करणार नसतील तर राज्य सरकारने त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. देशात शंभर कोटी हिंदू असल्यानेच येथे अल्पसंख्याक सुरक्षित असून त्यांना स्वातंत्र्य उपभोगता येत आहे. हिंदू समाज सहनशील असून आमच्या सहनशीलतेस कुणीही आमचा कमकुवतपणा समजू नये. 
- देवेंद्र फडणवीस, नेते भाजप 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: fir registered by kalaburagi police against MIM leader Waris Pathan for controversial comment