हवेत उडणाऱ्या विमानात अचानक वाजला फायर अलार्म, दिल्ली विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग...नेमकं काय घडलं?

Air India Flight: एअर इंडियाच्या दिल्लीहून बंगळुरूला जाणाऱ्या फ्लाइटमध्ये अचानक फायर अलार्म वाजला, ज्यामुळे फ्लाइटला आपत्कालीन लँडिंग करावे लागले.
Air India Flight
Air India Flightesakal

Air India Flight:

एअर इंडिया फ्लाइटने दिल्ली विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग केले. हवेत उडताना अचानक विमानात फायर अलार्म वाजल्याने घबराट निर्माण झाली होती. ही फ्लाइट दिल्लीहून बंगळुरूला जात होते. या फ्लाइटमध्ये 175 प्रवाशांशिवाय केबिन क्रू मेंबर्सचाही समावेश होता. मात्र, सुदैवाने कोणतीही दुर्घटना घडली नाही.

एअर इंडियाचे फ्लाइट क्रमांक AI-807 दिल्लीहून बेंगळुरूला उड्डाण करताच वैमानिकाने आपत्कालीन परिस्थितीत लगेचच ते परत दिल्ली विमानतळावर उतरवले. तपासादरम्यान विमानात छोटी आग लागल्याचे समोर आले आहे. विमानात 175 प्रवासी होते. विमानातील प्रवाशांना नंतर दुसऱ्या विमानाने बंगळुरूला नेण्यात आले.

 एएनआयने दिलेल्या माहितीनुसार दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या अधिकाऱ्यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. एअर इंडियाचे फ्लाइट क्रमांक AI-807 दिल्ली विमानतळावरून बेंगळुरूसाठी 5.52 वाजता उड्डाण केले. टेक ऑफ करण्यापूर्वी विमानाची संपूर्ण सुरक्षा आणि तांत्रिक तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान विमानात कोणताही दोष आढळला नाही. मात्र फ्लाइट टेक ऑफ होताच पायलटजवळील फायर सिग्नल्सने इशारा देण्यास सुरुवात केली. पायलटने विमान वळवले आणि एअर ट्रॅफिक कंट्रोलला माहिती दिली.

Air India Flight
Delhi Liquor Scam : ‘आप’ अन् केजरीवाल दोघेही आरोपी; न्यायालयामध्ये ‘ईडी’कडून आठवे आरोपपत्र

पायलटने एअर ट्रॅफिक कंट्रोलला माहिती दिल्यानंतर एटीसीने विमानाला इमर्जन्सी लँडिंग करण्याची परवानगी दिली. तसेच एटीसीने दिल्ली विमानतळावर संपूर्ण आपत्कालीन प्रोटोकॉल घोषित केला.

दिल्ली अग्निशमन सेवेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, विमानात आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी रवाना करण्यात आल्या.आम्हाला संध्याकाळी 6.15 वाजता आयजी विमानतळाकडून माहिती मिळाली. आम्ही तातडीने तीन अग्निशमन बंब पाठवले. मात्र, विमान सुखरूप उतरले आणि कोणताही अपघात झाला नाही.

Air India Flight
Narendra Modi : ‘विकसित भारत’ देईन; शिवाजी पार्कवरून पंतप्रधान मोदींचे आश्‍वास

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com