Fri, Feb 3, 2023

दिल्ली: CBI कार्यालयाला आग; अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल
Published on : 17 September 2021, 9:54 am
नवी दिल्ली: दिल्लीतील सीबीआय कार्यालयाच्या इमारतीमध्ये आग लागली घटना घडली आहे. लोधी रोड परिसरातील सीजीओ कॉम्प्लेक्समधील सीबीआय इमारतीच्या तळमजल्याला आग लागली आहे. इमारतीतील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यात आले आहे. अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून, आग विझवण्याचे काम सुरु आहे.
दिल्लीतील लोधी रोड परिसरात असलेल्या या कार्यालयाला मोठी आग लागल्यानंतर सर्व कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यात आले आहे. आग्निशमन दलाचे जवान आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करता आहेत. इमारतीच्या तळ मजल्याला आग लागली होती, मोठ्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आली असल्याची माहिती अग्निशमन दलाचे अधिकारी एस.के. दुवा यांनी दिली आहे.