esakal | शताब्दी एक्सप्रेसच्या डब्याला भीषण आग; दिल्ली-डेहराडून दरम्यान घडली घटना
sakal

बोलून बातमी शोधा

Shatabdi Express

आगीवर नियंत्रण आणण्यात आलं असून आसने पूर्णपणे जळून गेली असल्याची माहिती उत्तराखंडचे पोलिस महासंचालक अशोक कुमार यांनी दिली. 

शताब्दी एक्सप्रेसच्या डब्याला भीषण आग; दिल्ली-डेहराडून दरम्यान घडली घटना

sakal_logo
By
वृत्तसंस्था

डेहराडून : दिल्लीहून डेहराडूनला निघालेल्या शताब्दी एक्सप्रेसच्या एका वातानुकुलीत डब्याला अचानक आग लागली. ही घटना उत्तराखंडमधील कान्सरो भागात शनिवारी (ता.१३) घडली. शॉर्ट सर्किटमुळे सी-४ डब्याला आग लागल्याचे पोलिसांनी सांगितले. शताब्दी एक्स्प्रेसमधील सर्व प्रवासी सुखरुप असून कोणीही जखमी झाले नसल्याचे सांगण्यात आले. या घटनेमुळे काही काळ रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती.

रेल्वे डब्याला आग लागल्याचे समजताच इमर्जन्सी ब्रेक लावून गाडी थांबवण्यात आली. तोपर्यंत आगीने पूर्ण डब्याला वेढले होते. डब्यातील ३५ प्रवासी मिळेल त्या मार्गाने बाहेर पडले. प्रसंगावधान राखत आग लागलेला डबा वेगळा करण्यात आला. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. 

झाडाचा आडोसा घेणं पडलं महागात; अचानक वीज कोसळली अन्...​

त्या डब्यातील प्रवाशांना सुरक्षितस्थळी नेईपर्यंत अग्निशामक दल घटनास्थळी पोहोचलं होतं. त्यानंतर गाडी डेहराडूनकडे रवाना झाली. आगीवर नियंत्रण आणण्यात आलं असून आसने पूर्णपणे जळून गेली असल्याची माहिती उत्तराखंडचे पोलिस महासंचालक अशोक कुमार यांनी दिली. 

खूशखबर ! 60 वर्षांवरील व्यक्तींना मोदी सरकार देणार महिन्याला 3000 रुपये, अशी करा नोंदणी​

उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी ट्विट करत म्हटले आहे की, दिल्लीहून डेहराडूनला जाणाऱ्या शताब्दी एक्सप्रेसच्या एका डब्याला राजाजी टायगर रिझर्व्हच्या कान्सरो रेंज परिसरात आग लागली. भगवान बद्री विशाल आणि बाबा केदारनाथ यांच्या कृपेनं कोणतीही जीवित हानी झाली नसल्याची माहिती मिळाली असून सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. 

- देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

loading image
go to top