Clinic Fire : मोठी दुर्घटना! क्लिनिकला भीषण आग; डॉक्टर दाम्पत्यासह 5 जणांचा होरपळून मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Clinic Fire

या घटनेची माहिती रुग्णालयातील इतर कर्मचाऱ्यांना समजताच सर्व रुग्णांना तातडीनं बाहेर काढून दुसऱ्या इमारतीत हलवण्यात आलं. यामुळं त्यांचा जीव वाचला.

Clinic Fire : मोठी दुर्घटना! क्लिनिकला भीषण आग; डॉक्टर दाम्पत्यासह 5 जणांचा होरपळून मृत्यू

झारखंडच्या धनबादमधील (Jharkhand Dhanbad) एका क्लिनिकमध्ये भीषण आग (Clinic Fire) लागली. या दुर्घटनेत क्लिनिकमध्ये तैनात असलेल्या डॉक्टर (Doctor) दाम्पत्यासह 5 जणांचा मृत्यू झाला आहे.

ही घटना धनबाद शहरातील बँक मोड पोलीस स्टेशन हद्दीतील हाजरा क्लिनिकमध्ये घडलीये. माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचलं असून अग्निशमन दलाच्या पाच गाड्यांच्या मदतीनं आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलंय. ही घटना शुक्रवारी रात्री दोनच्या सुमारास घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, अपघाताच्या वेळी डॉ. विकास हाजरा आणि रुग्णालयातील इतर कर्मचारी आपापल्या खोलीत झोपले होते. बहुधा याच दरम्यान रुग्णालयातील वायरिंगमध्ये शॉर्टसर्किट झालं असावं, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. घटनेच्या वेळी क्लिनिकमध्ये 25 हून अधिक रुग्ण दाखल होते.

या घटनेची माहिती रुग्णालयातील इतर कर्मचाऱ्यांना समजताच सर्व रुग्णांना तातडीनं बाहेर काढून दुसऱ्या इमारतीत हलवण्यात आलं. यामुळं त्यांचा जीव वाचला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत डॉ. विकास हाजरा यांच्या पुतण्याचाही मृत्यू झाला आहे. दोन दिवसांपूर्वी तो कोलकाताहून धनबादला त्याच्या मामाकडं आला होता.