Delhi Felicitation: दिल्लीतील अखिल भारतीय महिला शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलनात दिपाली जोगदंडे यांचा कर्तृत्वगौरव

दिल्लीतील पहिल्या अखिल भारतीय महिला शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलनात व्हिजिपीजी विभागाच्या दिपाली जोगदंडे यांचा शैक्षणिक व साहित्यिक योगदानाबद्दल सन्मान
देशाच्या राजधानीत प्रथमच 'सरहद' आणि महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने महिला शासकीय अधिकाऱ्यांसाठी हे विशेष साहित्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले.

देशाच्या राजधानीत प्रथमच 'सरहद' आणि महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने महिला शासकीय अधिकाऱ्यांसाठी हे विशेष साहित्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले.

Sakal

Updated on

पाली : देशाच्या राजधानीत महाराष्ट्र सदन येथे छत्रपती महाराणी ताराराणी यांच्या ३५१ व्या जयंती वर्षानिमित्त आयोजित पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन' मोठ्या उत्साहात संपन्न झाले. 'जागर कर्तृत्वाचा, उत्सव साहित्याचा' हे ब्रीदवाक्य घेऊन पार पडलेल्या या ऐतिहासिक सोहळ्यात राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (MSCERT), पुणे येथील व्हिजिपीजी विभागाच्या अधिकारी दिपाली जोगदंडे यांना त्यांच्या विशेष योगदानाबद्दल सन्मानित करण्यात आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com