Spiritual Journey : जम्मू-काश्मीरमधील हज यात्रेकरूंचा पहिला जत्था रविवारी श्रीनगर येथून रवाना झाला. उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी भाविकांना हिरवा झेंडा दाखवून शांततेसाठी प्रार्थना करण्याचे आवाहन केले.
श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील हज यात्रेकरूंचा पहिला जत्था रविवारी येथील शेखूल सलाम आंतरराष्ट्रीय विमानतळावरून रवाना झाला. जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी या पहिल्या जत्थ्याला हिरवा झेंडा दाखविला.