Operation Ajay: इस्राइलमधला अनुभव अवर्णनीय! युद्धभूमीतून परत आलेल्या भारतीयांनी मानले केंद्र सरकारचे आभार

Operation Ajay
Operation Ajay

नवी दिल्ली- इस्राइल आणि हमासमध्ये युद्ध सुरु आहे. त्यामुळे अनेक भारतीय इस्राइलमध्ये अडकून पडले होते. अशा परिस्थितीत केंद्र सरकारने 'ऑपरेशन अजय' लॉन्च केले असून त्याअंतर्गत पहिले विशेष विमान भारतीयांना घेऊन देशात उतरलं आहे. २१२ प्रवाशांना घेऊन हे विमान आज सकाळी नवी दिल्लीत आले. केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यावेळी विमानतळावर उपस्थित होते.

युद्धजन्य प्रदेशातून आलेल्या भारतीयांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद दिसून आला. प्रवाशांनी भारत सरकारचे याबाबत आभार मानले आहेत. युद्ध सुरु असल्याने एअर इंडियाने आपली विमानसेवा थांबवली होती. त्यामुळे इस्राइलमध्ये अडकलेल्या भारतीयांचा नाइलाज झाला होता. अशात भारत सरकारने ऑपरेशन आखून तेथे अडकलेल्या भारतीयांना परत देशात आणण्यासाठी मोहीम आखली आहे.

Operation Ajay
Israel-Hamas Conflict: हमास नरमतोय! इस्त्राइली महिला आणि तिच्या चिमुकल्या मुलाची केली सुटका; पाहा व्हिडिओ

'फर्स्ट कम, फर्स्ट सर्व्ह' अशा तत्त्वावर प्रवाशांना संधी दिली जात आहे. नोंदणी करणाऱ्या प्रत्येक भारतीयाला परत मायभूमीत आणलं जाणार आहे. एनडीटीव्हीच्या माहितीनुसार विमान प्रवासाचा खर्च भारत सरकार उचलत आहे. पहिले विमान भारतात दाखल झाले असून आणखी भारतीयांना देशात परत आणले जाणार आहे.

भारतात परत आलेल्यांमध्ये अनेक विद्यार्थ्यांचा समावेश आहे. शुभम कुमारने पीटीआयला प्रतिक्रिया दिली की, आम्ही भारत सरकारचे आभारी आहोत. अनेक माझे विद्यार्थी मित्र घाबरले होते. पण, याकाळात आमच्यासोबत भारतीय दूतावास होता. परतण्यासाठीची नोंदणी सुरु झाल्यानंतर आम्हाला मोठा दिलासा मिळाला. त्यांनी सर्वकाही सोय केली.

Operation Ajay
Israel War : इस्राइल-हमास युद्धादरम्यान 'एक्स'ची मोठी कारवाई; चुकीची माहिती पोस्ट करणारे शेकडो अकाउंट्स ब्लॉक

इस्राइलमध्ये १८ हजार भारतीय अडकल्याचे सांगितले जाते. तसेच भारतात परत येण्यासाठी अनेकांनी नोंदणी केली आहे. या सर्वांना ऑपरेशन अजय अंतर्गत परत आणले जाणार आहे. एका विद्यार्थ्याने म्हटलं की, 'अशा प्रकारच्या परिस्थितीचा आम्ही पहिल्यांदाच सामना करत होतो. पण, आम्ही भारत सरकारचे खूप आभारी आहोत. विशेष करुन पंतप्रधान मोदी यांनी आम्हाला परत आणले त्याबद्दल त्यांचे धन्यवाद.' (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com