ram mandir makar sankrant patang
sakal
अयोध्येतील राम मंदिरात मकर संक्रांतीचा सण मोठ्या थाटामाटात आणि धार्मिक उत्साहात साजरा झाला. या विशेष दिनी प्रभू रामललांना चक्क पतंग अर्पण करण्यात आली, जी भाविकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरली. कडाक्याच्या थंडीतही लाखो भाविकांनी शरयू नदीत श्रद्धेची डुबकी मारून दानधर्म केला आणि रामललाचे दर्शन घेतले.