
रायपूर : ‘‘छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त सुकमा जिल्ह्यातील एका दुर्गम गावात पहिला मोबाईल दूरध्वनी मनोरा (टॉवर) उभारण्यात आला आहे,’’ अशी माहिती अधिकाऱ्यांनी रविवारी दिली. होळीच्या दिवशी टेकुलागुडेम गावात केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) छावणीत हा मनोरा उभारला आहे.