मोठी बातमी: IAF च्या तळावर हल्ल्यासाठी प्रथमच ड्रोनचा वापर

एअर फोर्स स्टेशनपासून भारत-पाकिस्तान सीमा १४ किमी अंतरावर आहे.
मोठी बातमी: IAF च्या तळावर हल्ल्यासाठी प्रथमच ड्रोनचा वापर

श्रीनगर: जम्मूमधील एअर फोर्स स्टेशनच्या (IAF) उच्च सुरक्षा असलेल्या भागामध्ये आज दोन बॉम्बस्फोट (blast) झाले. या बॉम्ब हल्ल्यासाठी ड्रोन्सचा वापर झाल्याची शक्यता आहे. प्राथमिक तपासातून ही बाब समोर आली आहे. जम्मू विमानतळावर (jammu airport) बॉम्ब हल्ल्यासाठी सीमेपलीकडून ड्रोन्सचा वापर झाल्याची ही पहिली घटना ठरु शकते. इथे नागरी विमानांसाठी सुद्धा धावपट्टी आहे. ही धावपट्टी आणि ATC इंडियन एअर फोर्सच्या नियंत्रणाखाली आहे. (first time drones used to drop explosives on Jammu air base)

जम्मूमधील या एअर फोर्स स्टेशनपासून भारत-पाकिस्तान सीमा १४ किमी अंतरावर आहे. यापूर्वी ड्रोन्सचा वापर करुन भारताच्या हद्दीत १२ किमी आतापर्यंत शस्त्रास्त्र टाकण्यात आली होती. रविवारी पहाटेच्या सुमारास एकापाठोपाठ एक असे दोन कमी तीव्रतेचे बॉम्बस्फोट झाले. एअरपोर्टच्या टेक्निकल एरियामधील हेलिपॅड जवळ हे बॉम्बस्फोट झाले.

मोठी बातमी: IAF च्या तळावर हल्ल्यासाठी प्रथमच ड्रोनचा वापर
चिमुकल्या तुलसीची शिक्षणासाठी धडपड; फळं विकून पूर्ण केलं स्वप्न

पहिल्या स्फोटामध्ये इमारतीच्या छताचे नुकसान झाले. दुसऱा स्फोट मोकळ्या जागेत झाला. एअर फोर्स स्टेशनमध्ये पार्क करण्यात आलेले विमान हल्लेखोरांच्या टार्गेटवर असू शकते, असे सूत्रांनी सांगितले. या स्फोटात कोणीही जखमी झालेले नाही किंवा साहित्याचेही नुकसान झालेले नाही. जम्मूच्या एअर फोर्स स्टेशनवर उच्चस्तरीय बैठक सुरु आहे. या बैठकीला एअर फोर्सचे अधिकारी आणि पोलीस उपस्थित आहेत.

मोठी बातमी: IAF च्या तळावर हल्ल्यासाठी प्रथमच ड्रोनचा वापर
अनिल देशमुखांच्या सांगण्यावरून बार मालकांकडून घेतले पैसे; वाझेंचा खुलासा

पहाटे १.२७ आणि त्यानंतर पाचच मिनिटांनी १.३२ च्या सुमारास हे बॉम्बस्फोट झाले. तपासासाठी IAF ची उच्चस्तरीय टीम थोड्याच वेळात जम्मूला पोहोचणार आहे. वेस्टर्न एअर कमांडर एअर मार्शल व्ही.आर.चौधरी यांनी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी जम्मूला पोहोचणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com