esakal | PM CARES फंडात 5 दिवसांत 3 हजार 76 कोटी; पी चिदंबरम यांनी उपस्थित केले प्रश्न
sakal

बोलून बातमी शोधा

p-chidambaram

आर्थिक वर्ष 2020 च्या निवेदनानुसार ही सर्वाधिक देणगी 27 ते 31 मार्च दरम्यान जमा झाली आहे. याच काळात पीएम केअर फंडचे अकाउंट तयार केले होते. या मिळालेल्या देणगीतील 3,075.85 कोटी रुपये देशातून ऐच्छिक स्वरुपात आली आहे.

PM CARES फंडात 5 दिवसांत 3 हजार 76 कोटी; पी चिदंबरम यांनी उपस्थित केले प्रश्न

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली : कोरोना महामारीच्या काळात  (Corona Crisis) फक्त 5 दिवसांत पीएम केअर फंडामध्ये (PM CARES Fund) 3 हजार 76 कोटी रुपये जमा झाले आहेत. सरकारने जाहीर केलेल्या लेखापरीक्षण अहवालातून ही माहिती समोर आली आहे. आर्थिक वर्ष 2020 च्या निवेदनानुसार ही सर्वाधिक देणगी 27 ते 31 मार्च दरम्यान जमा झाली आहे. याच काळात पीएम केअर फंडचे अकाउंट तयार केले होते. या मिळालेल्या देणगीतील 3,075.85 कोटी रुपये देशातून ऐच्छिक स्वरुपात आली आहे. तर यातील 39.67 लाख रुपये रक्कम परदेशातून आली आहे. पीएम केअर फंडाच्या निवेदनात असे म्हटले आहे की, हा निधी 2.25 लाख रुपयांपासून सुरू झाला होता आणि आतापर्यंत या फंडाला सुमारे 35 लाख रुपये व्याजही मिळाले आहे.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

या अकाउंटच्या व्यवहाराची सर्व माहिती लेखापरीक्षणानंतर  पीएम केअर फंडच्या वेबसाइटवर सार्वजनिक करण्यात आली आहे, पण यातील काही माहिती उघड केली नाही. यावर माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी ट्विट करून प्रश्न उपस्थित केले आहेत.  या देणगीदारांची माहिती का दिली नाही, असा सवाल त्यांनी केला आहे. सर्व स्वयंसेवी संस्था किंवा कोणत्याही ट्रस्टला मर्यादेपेक्षा जास्त देणगी दिलेल्या देणगीदारांची नावे जाहीर करण्यास अनिवार्य असतं. मग पीएम केअर फंड यातून मुक्त का? देणगीदारांची नावे सरकार का उघड करत नाही ? असे प्रश्न पी चिदंबरम यांनी विचारले आहेत. कोविड संकटाच्या पार्श्वभूमीवर सरकारने पंतप्रधान नागरिक मदत व आपत्कालीन परिस्थिती निधी (पीएम कॅरस फंड) मध्ये मदत सुरू केली.  जेथे या साथीवर लढा देण्यासाठी देणगीदार कोणतीही रक्कम सरकारला देऊ शकतात.

कोविड संकटाच्या पार्श्वभूमीवर सरकारने प्राइम मिनिस्टर सिटीजन असिस्टंस एंड रिलीफ इन इमरजंसी सिचुएशन फंड (PM CARES Fund) सुरु केलं होतं. या अकाउंटवर कोरोनाविरुध्द लढा देण्यासाठी कोणताही देणगीदार कितीही रक्कम सरकारला देऊ शकत आहेत.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

loading image