गाडीतील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एका व्यक्तीची प्रकृती गंभीर असून, त्याला जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले आहे.
बंगळूर : चित्रदुर्ग जिल्ह्यातील सिबरा गावाजवळ एका वेगाने येणाऱ्या ट्रक आणि मोटारीमध्ये रविवारी सकाळी भीषण अपघात (Car-Truck Accident) झाला आणि त्यात पाच जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये बंगळूर येथील निवृत्त बीएमटीसी कर्मचारी शांत मूर्ती (वय ६०), विद्यारण्यपूर येथील रुद्रस्वामी (५२) आणि बंगळूर उत्तर येथील इराणा लेआउट येथील मल्लिकार्जुन (५०) यांचा समावेश आहे.