police
police

पोलिस दलात पाच लाख जागा रिक्त

‘बीपीआर अँड डी’च्या अहवालातील माहिती; महिलांचे प्रमाण नगण्य
नवी दिल्ली -  पोलिस दलात देशभरात पाच लाख जागा रिक्त आहेत. २०१९ मध्ये एकूण पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये महिलांचे प्रमाणे ९ टक्‍क्‍यांपेक्षा कमी होते, असे सरकारच्या नव्या माहितीतून स्पष्ट झाले आहे. 

पोलिस दलात एकूण २५ लाख ९५ हजार ४३५ जागा आहेत. त्यापैकी २० लाख ६७ हजार २७० जागांवर पोलिस कार्यरत असून पाच लाख २८ हजार १६५ जागा रिक्त आहेत. ही माहिती पोलिस संशोधन आणि विकास केंद्रा (बीपीआर अँड डी) च्या वार्षिक अहवालात दिली आहे. ही संस्था केंद्रीय गृह मंत्रालयाच्या नेतृत्वाखाली काम करते. पोलिस संघटनांच्या अहवालाचे प्रकाशन गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते बुधवारी (ता.२९) झाले. त्या वेळी ‘बीपीआर अँड डी’चे संचालक व्ही. एस. के.  कौमुदी उपस्थित होते. 

अहवालातील माहितीनुसार पोलिस दलात महिलांची कुमक एक लाख८५ हजार ६९६ म्हणजेच ८.९८ टक्के होते. गेल्या वर्षी हे प्रमाण ९. २५ टक्‍क्‍यांपर्यंत वाढले. पोलिस दलात २०१८मध्ये एक लाख ५० हजार ६९० नव्या उमेदवारांची भरती झाली, असेही यात नमूद केले आहे. केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाची (सीएपीएफ) क्षमता १ जानेवारी २०१९ रोजी १० लाख ९८ हजार ७७९ होती. प्रत्यक्षात नऊ लाख ९९ हजार ९१८ जागा भरलेल्या आहेत. ‘सीएपीएफ’त महिलांची संख्या २९ हजार ५३२ म्हणजे २. ९५ टक्के आहे. देशात एक लाख नागरिकांमध्ये सध्या १५८. २२ पोलिस असे प्रमाण आहे. नियमानुसार ते १९८.६५ असायला हवे. एका पोलिसामागे ५०३.४० असे प्रमाण हवे असताना ते ६३२.०२ असे आहे. 

साडेसोळा हजार पोलिस स्थानके
देशात मंजूर १६ हजार ७७१ पोलिस स्थानकांपैकी १६ हजार ५८७ पोलिस स्थानके कार्यरत आहेत. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये  दोन लाख चार हडार ८०७ पोलिस वाहने असून चार लाख २७ हजार ५२९ सीसी टीव्ही कॅमेरे आहेत, अशी माहिती अहवालात दिली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com