Rameshwaram Cafe Blast : रामेश्वरम कॅफेत बॉम्बस्फोट; चेन्नईतून पाच जणांना अटक, स्फोटामागे कुख्यात दहशतवाद्याचा हात?

एनआयए अधिकाऱ्यांनी चेन्नईतील (Chennai) सिद्दयाल टाउन आणि बिदरियार मंदिराजवळील काही घरांवर छापे टाकले.
Bangalore Rameshwaram Cafe Blast Case NIA
Bangalore Rameshwaram Cafe Blast Case NIAesakal
Summary

चेन्नईत अटक करण्यात आलेल्या चौघांचे आरटीनगरचा कुख्यात दहशतवादी नझीरशी संबंध असल्याचे निष्पन्न झाले आहे.

बंगळूर : शहराला हादरवून सोडणाऱ्या व्हाईटफिल्ड येथील रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणाची (Rameshwaram Cafe Blast Case) गंभीर दखल घेत तातडीने कारवाई करणाऱ्या राष्ट्रीय तपास संस्थेच्या (NIA) अधिकाऱ्यांनी चेन्नईच्या अनेक भागात छापे टाकून पाच जणांना अटक केली.

एनआयए अधिकाऱ्यांनी चेन्नईतील (Chennai) सिद्दयाल टाउन आणि बिदरियार मंदिराजवळील काही घरांवर छापे टाकले आणि पाच जणांना अटक केली आणि अज्ञात ठिकाणी त्यांची चौकशी केली. चेन्नईत अटक करण्यात आलेल्या चौघांचे आरटीनगरचा कुख्यात दहशतवादी नझीरशी संबंध असल्याचे निष्पन्न झाले आहे. अधिक तपास सुरू आहे.

Bangalore Rameshwaram Cafe Blast Case NIA
भटक्या कुत्र्याने चावा घेतल्यामुळे 21 वर्षाच्या निष्पाप तरुणीचा मृत्यू; श्रृष्टीच्या मृत्यूला कोण जबाबदार?

समशुद्दीनच्या घरावर तामिळनाडूतील रामनाथपुरम जिल्ह्यातील किलाकराई भागात छापा टाकला. सध्या परप्पन अग्रहार तुरुंगात असलेला नझीर हा तुरुंगातून कट रचणारा कुख्यात दहशतवादी आहे. पोलिसांनी सय्यद सोहेल, जाहिद, मुदासीर, उमर, फैजल यांना ग्रेनेड, पिस्तूल आणि जिवंत गोळ्यांसह अटक करण्यात आली.

Bangalore Rameshwaram Cafe Blast Case NIA
रात्रीचे ते वेदनादायी चार-पाच तास..; भटक्या कुत्र्याने पायाचा लचका तोडल्याने निष्पाप श्रृष्टीचा मृत्यू, मृतदेह थेट स्मशानभूमीत

त्यानंतर सात पिस्तुले, पंचेचाळीस जिवंत गोळ्या, पंधरा मोबाईल फोन, २० हून अधिक सिमकार्ड, एक खंजीर जप्त केला. एक फेब्रुवारीला झालेल्या रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोटातही नझीरचा हात आहे का, त्याची चौकशी सुरु आहे. आता नझीरशी चौकशी केली जाणार आहे. सध्या नझीर परप्पनच्या अग्रहार कारागृहात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com