एकाच कुटुंबातील पाच जणांची हत्या; गूढ कायम, गावात तणाव

सकाळ न्यूज नेटवर्क 
सोमवार, 6 जानेवारी 2020

सोराव येथील रहिवासी विजय शंकर तिवारी (वय 65), त्यांची पत्नी, दोन मुले आणि अन्य एकाची काल रात्री राहत्या घरात धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली.

प्रयागराज (उत्तर प्रदेश) : प्रयागराजच्या सोराव भागातील युसूफपूर गावात काल रात्री एकाच कुटुंबातील पाच जणांची हत्या करण्यात आली. या हत्याकांडाने प्रयागराज जिल्ह्यात खळबळ उडाली असून, घटनास्थळी वरिष्ठ पोलिस अधिकारी दाखल झाले. याशिवाय युसूफपूर भागात पोलिसांची जादा कुमक मागवण्यात आली असून, या घटनेने सोराव येथे तणावाचे वातावरण आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सोराव येथील रहिवासी विजय शंकर तिवारी (वय 65), त्यांची पत्नी, दोन मुले आणि अन्य एकाची काल रात्री राहत्या घरात धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. ही घटना उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली आणि या घटनेची माहिती कळताच घटनास्थळी बघ्याची गर्दी जमली. या घटनेबाबत कोणीही बोलावयास तयार नाही. एका कुटुंबाचे हत्याकांड कोणी आणि का घडवून आणले, या प्रश्‍नाचे उत्तर चोवीस तासांनंतरही अनुत्तरीत आहे. पोलिसांकडून घटनास्थळाची झाडाझडती घेतली जात आहे.

आणखी वाचा - शिवभोजन थाळीचा फायदा नेमका कुणाला?

तिवारी कुटुंबीयांच्या नातेवाइकाशी संपर्क केला जात असून, पूर्ववैमनस्यातून ही घटना तर घडली नाही ना, याचा शोध पोलिस घेत आहेत. पोलिसांकडून या घटनेसंदर्भात अद्याप अधिकृत माहिती दिली गेली नाही. न्यायवैद्यक पथकाला पाचारण करण्यात आले आहे. सोराव पोलिस ठाण्यासह अनेक पोलिस ठाण्यांचे पोलिस कर्मचारी, जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी घटनेची माहिती घेतली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: five people killed from one family uttar pradesh prayagraj