Bihar Police: बिहारमध्ये पाच पोलिस कर्मचारी निलंबित; गुंड चंदन मिश्रा हत्या प्रकरण, कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी ठपका
Crime Investigation: पाटणा रुग्णालयात गँगस्टर चंदन मिश्राच्या हत्येप्रकरणात पोलिसांचे कर्तव्य पालन न केल्यामुळे पाच पोलिसांना निलंबित करण्यात आले. निलंबित केलेल्या पोलिसांमध्ये उपनिरीक्षक, सहायक उपनिरीक्षक आणि अन्य दोन पोलिसांचा समावेश आहे.
पाटणा : गँगस्टर चंदन मिश्राच्या पाटणा रुग्णालयातील हत्या प्रकरणात कर्तव्यात दुर्लक्ष केल्याप्रकरणी पाच पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. निलंबित करण्यात आलेल्यांमध्ये एका उपनिरीक्षक, दोन सहायक उपनिरीक्षक आणि दोन पोलिसांचा समावेश आहे.