
कोरोना व्हायरसने एकापाठोपाठ एक असे संपूर्ण कुटुंबच संपवून टाकले
रांची : जगभरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. त्यानंतर आता झारखंडमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. कोरोना व्हायरसने एकापाठोपाठ एक असे संपूर्ण कुटुंबच संपवून टाकले. पहिल्यांदा या कुटुंबातील वृद्ध महिलेला कोरोनाची लागण झाली होती. त्यामध्ये तिचा मृत्यू झाला. त्यानंतर तिच्या पार्थिवाला खांदा देणाऱ्या पाचही मुलांना कोरोनाची लागण झाली आणि यामध्येच त्यांचाही मृत्यू झाला.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
कोरोना व्हायरसचा संसर्ग होण्याचे प्रमाण मोठे आहे. एकाला झाला तर अनेकांना याची बाधा होत असल्याची अनेक प्रकरणं समोर आली आहेत. कोरोना झाला असे जरी म्हटले तरी कोणीही जवळदेखील येत नाही. असाच काहीसा प्रकार झारखंडमध्ये पाहिला मिळाला आहे. एका वृद्ध महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. महिलेच्या अंत्ययात्रेसाठी तिच्या मुलांनी तिच्या पार्थिवाला खांदा दिला होता. पण या खांदा देणाऱ्या मुलांचा काही दिवसांतच मृत्यू झाला. इतर काही नातेवाईकांची प्रकृती बिघडली आहे. ही देशातील पहिलीच घटना असल्याचे सांगितले जात आहे. याबाबतचे वृत्त एका हिंदी वेबसाईटने दिले आहे.
लग्नासाठी झारखंडमध्ये
संबंधित वृद्ध महिला दिल्लीहून एका लग्न सोहळ्यासाठी झारखंडमध्ये आली होती. त्यावेळी तिला कोरोनाची लागण झाली होती.
चार जुलैला महिलेचा मृत्यू
या महिलेचा 4 जुलैला कोरोनामुळे मृत्यू झाला होता. त्यानंतर तिच्या मुलांचाही कोरोनामुळे मृत्यू झाला. या मुलांचा रांची येथील रिम्स कोविड रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. काही दिवसानंतर दुसऱ्या मुलाचा केंद्रीय रुग्णालयात मृत्यू झाला.
15 दिवसांत संपूर्ण कुटुंबग उद्धवस्त
मृताचा हा क्रम थांबला नाही तर तिसरा मुलगाही जवळच्या क्वारंटाईन सेंटरमध्ये होता. त्याचीही प्रकृती खालावली होती. त्यानंतर त्याचा मृत्यू झाला. तर 16 जुलैला इतर मुलाला कॅन्सरच्या उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हा त्याला कोरोनाची लागण झाल्याचे समजले. त्यानंतर त्यातच त्याचाही मृत्यू झाला. या सर्व मुलांनी आपल्या कोरोनाबाधित आईच्या पार्थिवाला खांदा दिल्याची माहिती दिली जात आहे.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा