Gurgaon Restaurant: रेस्टॉरंटमध्ये जेवल्यानंतर 5 जणांना सुरु झाल्या रक्ताच्या उलट्या; नेमकं काय झालं? व्हिडिओ व्हायरल

dry ice contained mouth freshener: गुरुग्राममधील एका रेस्टॉरंटमधून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पाच लोकांनी माऊथ फ्रेशनर खाल्ल्याने त्यांना रक्ताच्या उलट्या झाल्या आहेत.
Gurgaon Restaurant: रेस्टॉरंटमध्ये जेवल्यानंतर 5 जणांना सुरु झाल्या रक्ताच्या उलट्या; नेमकं काय झालं? व्हिडिओ व्हायरल

नवी दिल्ली- गुरुग्राममधील एका रेस्टॉरंटमधून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पाच लोकांनी माऊथ फ्रेशनर खाल्ल्याने त्यांना रक्ताच्या उलट्या झाल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अंकित कुमार आपली पत्नी आणि मित्रांसोबत रात्रीच्या जेवणासाठी La Forestta Cafe रेस्टॉरंटमध्ये गेले होते. जेवणानंतर त्यांनी माऊथ फ्रेशनर खाल्लं आणि त्यांची तब्बेत बिघडली. (Five vomit blood at Gurgaon restaurant after consuming dry ice contained mouth freshener)

माऊथ फ्रेशनर खाल्ल्यानंतर त्यांच्या तोंडामध्ये जळजळ सुरु झाली आणि उलट्या होऊ लागल्या. काही वेळाने त्यांच्या तोंडातून रक्त येऊ लागले. सर्व परिस्थिती पाहता त्यांना त्वरित हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. अंकित कुमार यांनी मुलाला उचलून घेतलेलं असल्याने त्यांनी माऊथ फ्रेशनर खाल्लेलं नव्हतं. त्यामुळे ते यातून वाचले आहेत. इतर पाच पैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याचं समजतंय.

Gurgaon Restaurant: रेस्टॉरंटमध्ये जेवल्यानंतर 5 जणांना सुरु झाल्या रक्ताच्या उलट्या; नेमकं काय झालं? व्हिडिओ व्हायरल
Crime: भिक्षा दिली नाही म्हणून महिलेवर त्रिशूळाने केला वार, संतप्त नागरिकांनी भिक्षेकरी बाबाला विजेच्या खांबाला बांधलं

अंकित कुमार यांनी पोलीस ठाण्यामध्ये यासंदर्भात तक्रार दाखल केली. त्यांनंतर पोलिसांनी एफआयआर दाखल करुन घेतला असून तपास सुरु केला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये पाच लोकांची गंभीर अवस्था पाहायला मिळत आहे. त्यामुळे माऊथ फ्रेशनर खाऊन असं काय झालं? असा प्रश्न लोकांना पडत आहे.

डॉक्टर काय म्हणाले?

डॉक्टरांनी यासंदर्भात खुलासा केला आहे. डॉक्टरांनी म्हटलंय की, पाच जणांनी जे खाल्लं आहे ते ड्राय आईस आहे. कार्बनडाय ऑक्साईडचे हे ठोस स्वरुप आहे. याचा वापर कुलिंग एजेंट म्हणून केला जातो. मेडिकल उद्योग, फूड इंडस्ट्रीमध्ये याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो.

Gurgaon Restaurant: रेस्टॉरंटमध्ये जेवल्यानंतर 5 जणांना सुरु झाल्या रक्ताच्या उलट्या; नेमकं काय झालं? व्हिडिओ व्हायरल
शाहू महाराजांबाबत सर्व सकारात्मक? पवारांची डिनर डिप्लोमसी, सतेज पाटलांच्या घरी जमली नेत्यांची मांदियाळी

रेस्टॉरंट मालकाविरोधात गुन्हा

रेस्टॉरंटचे मॅनेजर गगन शर्मा यांच्याविरोधात एफआयआर दाखल झाला आहे. पण, त्यांनी या सर्व घटनेच्या कारणामागे शंका घेतली आहे. त्यांचं म्हणणं आहे, की रेस्टॉरंटमध्ये याआधी असं कधीही झालं नाही. आम्हाला फसवण्यालाठी असं केलेलं असू शकतं. आमच्या रेस्टॉरंटचे नाव खराब होईल असं आम्ही का करु? शिवाय आम्ही ड्राय आईस ठेवत नाही. रेस्टॉरंट मालकाने नुकसान भरपाई देण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र, पोलिसांनी तक्रारीनंतर रेस्टॉरंट मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com