दिल्लीला पुन्हा पुराचा धोका; हाय अलर्ट; यमुनेची पातळी वाढली

यमुना नदीच्या दिल्लीतील पात्रात हरियानातून लाखो क्यूसेक पाणी सोडण्यात आल्यामुळे राष्ट्रीय राजधानीला पुन्हा पुराचा धोका निर्माण झाला आहे.
Flood threat Delhi again High Alert level Yamuna rose
Flood threat Delhi again High Alert level Yamuna rose sakal
Updated on

नवी दिल्ली : यमुना नदीच्या दिल्लीतील पात्रात हरियानातून लाखो क्यूसेक पाणी सोडण्यात आल्यामुळे राष्ट्रीय राजधानीला पुन्हा पुराचा धोका निर्माण झाला आहे. यमुनेची पाणीपातळी धोक्याच्या खुणेजवळ पोचली आहे. दिल्ली सरकारने सखल भागांत नदीजवळ राहणाऱ्या लाखो लोकांना स्थलांतरित करण्याची तयारी सुरू कली आहे. यमुनेची पाणीपातळी शुक्रवारी सकाळी २०७.५५ मीटरवर पोचली. ही पाणीपातळी धोक्याच्या खुणेच्या जेमतेम ०.१५ मीटर खाली आहे. यमुनेचा जलस्तर वाढल्याने जुना लोखंडी पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. दुपारी पाणीपातळी आणखी वाढल्याने सखल भागांतील नागरिकांना प्रशासनाच्या वतीने सुरक्षित जागी जाण्याचा इशारा फिरत्या वाहनांमधून देण्यात आल्या.

नदीकाठावरील व नदीपात्रातील झोपडपट्ट्या व वस्त्यांत राहणाऱ्या नागरिकांसाठी ‘हाय अलर्ट'' जारी करण्यात आला आहे. दिल्लीत मुळ जलस्रोत नाहीत. हरियानातील हाथिनी कुंड बंधाऱ्यायातून पाणी सोडण्यात आले की दिल्लीकरांची तहान भागते. या बंधाऱ्याच्या परिसरात जोरदार पाऊस झाल्याने पाण्याचा विसर्ग वाढला आहे. परिणामी यमुनेचे दिल्लीतील पात्र दुथडी वहात आहे. या बंधाऱ्यातून गुरुवारी १.०६ लाख क्यूसेक पाणी सोडण्यात आले. शुक्रवारी सकाळपासूनही विसर्ग सुरू असल्याने सखल भागांत, नदीकाठावर राहणाऱ्या लोकांना दुसऱ्या जागी जाण्यास सांगण्यात आले. काश्मिरी गेट, आयटीओ, दिल्ली विधानसभेजवळचा काठ व पूर्व दिल्लीच्या सखल भागांतील लोकांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे.

लाचखोरीचे आरोप

काश्मिरी गेट पुलाजवळील काही झोपड्यांच्या परिसरात शुक्रवारी दुपारी पुराचे पाणी शिरले. त्यामुळे तेथील लोकांसाठी जवळचेच निवारागृह (रैन बसेरा) दिल्ली सरकारने खुले केले. मात्र तेथेही ‘जागा मिळविण्यासाठी‘ लाचलुचपत द्यावी लागत असल्याच्या तक्रारी अनेकांनी केल्या आहेत. दिल्ली प्रशासनाने पुराचा संभाव्य धोका लक्षात घेता बचाव पथके व छोट्या नौका तयार ठेवल्या आहेत. नागरिकांना सजगता बाळगण्यास सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com