केरळच्या रस्त्यावर महिलांचा महापूर 

केरळच्या रस्त्यावर महिलांचा महापूर 

त्रिवेंद्रम, ता.10 : केरळच्या रस्त्यांवर आज महिलांचा महापूर आला होता. येथील प्रसिद्ध शबरीमला मंदिर आणि त्याच्या नियमांच्या विरोधात महिलांनी आज मोर्चाचे आयोजन केले आहे. त्यात दोनशे ठिकाणांहून आलेल्या महिलांनी सहभाग घेतला आहे. हा मोर्चा कोणत्याही संघटनेच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेला नाही; मात्र अनेक हिंदू संघटनांनी यामध्ये सोशल मीडियाचा वापर करीत सहभागी झालेल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार सर्व वयोगटातील महिलांसाठी शबरीमला मंदिराचे दरवाजे उघडण्यात येतील, असे केरळ सरकारने स्पष्ट केले आहे. येत्या 18 ऑक्‍टोबरपासून भाविकांसाठी शबरीमलाचे दरवाजे उघडण्यात येणार आहेत. 

मंदिरात ज्या ठिकाणी महिलांना मज्जाव आहे तेथे महिला पोलिसांना तैनात करण्यात आले आहे. पोलिस महासंचालक लोकनाथ बेहरा म्हणाले की, शबरीमलाच्या पम्पा लोवर भागापर्यंतच पोलिसांची नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि शबरीमला कर्मसमिती यांनी या मोर्चाचे आयोजन केले होते. या मोर्चाची सुरवात भाजपचे प्रदेशाध्यक्ष पी. श्रीधरन पिल्लई यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या मोर्चाच्या उद्‌घाटनाच्या कार्यक्रमासाठी विशेष मंडप टाकण्यात आला होता. सचिवालयापर्यंत पोचण्यासाठी या मोर्चाला पाच दिवस लागणार असून, तो 15 ऑक्‍टोबरला तेथे पोचणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com