
मणिपूरमधील तब्बल १९ हजार जणांना मुसळधार पावसाचा फटका बसला आहे. सोमवारी नद्यांना आलेल्या पुरामुळे तीन हजार ३६५ घरांचे नुकसान झाले असून, १९ हजार८११ जणांना पुराचा फटका बसला आहे. प्रशासनाच्या वतीने ३१ मदत छावण्या उभारण्यात आल्या असून, यापैकी बहुतांश छावण्या या पूर्व इंफाळ जिल्ह्यात उभारल्या आहेत. सेनापती जिल्ह्यासह हेंगांग, वांगखै आणि खुरई या गावांना पुराचा सर्वाधिक फटका बसला आहे. मागील चार दिवसांपासून मणिपूरमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे राज्यात विविध ठिकाणी भूस्खलनाच्या ७४ घटना घडल्या आहेत.